rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वृषभ राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Taurus yearly rashifal. Astrology 2018
वर्ष 2018 मध्ये कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे आर्थिक परिणाम काय होतील याचा विचार केल्याशिवाय तुम्ही एक पाऊलही पुढे टाकू नका. सुरुवातीला तुम्ही थोडे आक्रमक असाल, ज्याचा विपरित परिणाम होईल, तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हळूहळू तुम्ही इच्छाशक्ती प्राप्त कराल आणि काहीतरी साध्य करावेसे वाटू लागेल. यश मिळविण्यासाठी वर्षभर तुम्हाला मेहनत करावी लागेल. कामात काही अपेक्षाभंग होण्याचीही शक्यता आहे.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
webdunia
धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
जानेवारी महिन्यानंतर तुमच्या आर्थिक संचयात वृद्धी होईल. वृषभ राशीच्या लोकांना काही छोट्या प्रवासांमुळे चांगले परिणाम पाहायला मिळतील. एप्रिल महिन्यात कोणताही धोका पत्करू नका. मे ऑगस्ट या कालावधीमध्ये उत्पन्नाचे एखादे नवीन साधन मिळेल. या वर्षात शक्यतो कोणालाही उधारउसनवारी करू नका. नोकरदार व्यक्तींना गेल्या वर्षात हुकलेले प्रमोशनही मिळू शकेल. नेहमीपेक्षा जास्त पगारवाढ होण्यास किंवा विशेष सुविधा मिळण्यास उत्तम काळ आहे. जानेवारी ते मार्च या दरम्यान तुमचे कौशल्य तुम्हाला दाखविता येईल. येत्या वर्षात आपल्या कामात कुठेही चूक होणार नाही याची दक्षता घ्या. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणेसाठी परदेशात जायचे आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षाची आणि उत्कंठेची तयारी ठेवणे चांगले. कलाकार, खेळाडू आणि सामूहिक क्षेत्रातील व्यक्तींना मार्च ते ऑगस्ट दरम्यान नेहमीपेक्षा जास्त प्रसिद्धी व पैसे मिळतील.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....
webdunia
गृहसौख्य व आरोग्यमान... 
कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने येणारे वर्ष चांगल्या अर्थाने संस्मरणीय ठरेल. घरातील ताणतणाव बर्‍याच अंशी कमी होतील. वादांवर शांततेने मार्ग निघेल. तुम्ही तीर्थयात्रेसाठी जाण्याचीही शक्यता आहे. मुलांची भरभराट होईल आणि त्यांची कामगिरी चांगली राहील. तुमच्या वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. तुम्हाला वाद आणि भांडणे टाळणे गरजेचे आहे कारण त्यामुळे तुमच्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते. पहिले दोन महिने कोणत्याही वादापासून किंवा भानगडीपासून दूर राहा, कारण त्यामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. असे असले तरी, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही आयुष्यात अधिक वेगात पुढे सरकाल. आरोग्याची काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या, कारण तुमचे वजन वाढण्याची शक्यता 
आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आणि धार्मिक कार्यांसाठी खर्च कराल. एकुणातच हे वर्ष सर्वसाधारण असेल. या वर्षात तुम्ही अनेक नवीन गोष्टी शिकाल. प्रकृतीच्या आजारांकडे नीट लक्ष ठेवा. तुमचे वैवाहिक आयुष्य आणि आर्थिक स्थिती चांगली असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिथुन राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल