Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुंभ राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Astrology 2018
हे वर्ष कुंभ राशीचे असून नवीन वर्षात महत्त्वाच्या ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे. गुरू भाग्यात वास्तव्य करणार आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या निर्णयांमुळे तुमच्या वर्षभरातील विकासाचा पाया रचला जाईल. तुमची संपत्ती वाढविण्यावर तुमचे लक्ष केंद्रित असेल आणि तुमच्या कष्टांमुळे तुम्ही हे वर्ष अधिक लाभकारक करू शकाल आणि तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. येत्या वर्षात राश्याधिपती शनी लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याला भाग्यस्थानामधल्या गुरुची जोड मिळेल. हे दोन्ही ग्रह तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला पूरक आहेत. तुमची रास शनीप्रधान असल्यामुळे तुम्ही तुमची वृत्ती धीरोदात्त ठेवून वाटचाल केलीत तर त्याचा बराच फायदा तुम्हाला या वर्षात होईल. 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
webdunia
धंदा, व्यवसाय व नोकरी....  
वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील. नोकरीत अपेक्षित जागी बदली होण्यास वर्षाची सुरुवात आणि त्यानंतर एप्रिल महिना अनुकूल आहे. एकंदरीत येते वर्ष प्रगतिकारक ठरेल. फेब्रुवारीनंतर तुमच्या कौशल्याला विशेष वाव असल्याने तुम्ही खूश असाल. ही परिस्थिती ऑगस्टनंतर बदलेल. व्यापार उद्योगात दृष्टीने वर्षाची सुरुवात धूमधडाक्यात होईल. आवडणारा प्रकल्प मिळाल्याने तुम्ही आनंदी असाल. त्यातून पैसे कमी मिळाले तरी आनंद भरपूर असेल. एप्रिलनंतर एखादी मोहात टाकणारी कल्पना तुमचे लक्ष आकर्षित करेल. पण थोडे काम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे मृगजळामागे धावणे आहे. मे महिन्यानंतर हातातले पैसे कसे निसटतील हे तुम्हाला समजणार नाही. ज्या व्यक्ती संशोधनकार्यात आहे त्यांना येत्या वर्षात उत्तम कामगिरी बजावता येईल. मे महिन्यानंतर काही अनपेक्षित बदल संभवतात, पण तुमचा नाइलाज असेल. सध्याच्या नोकरीतही थोडीशी अस्थिरता जाणवेल. परदेशी नोकरी मिळवू इच्छिणार्‍यांना जूनपूर्वीचा कालखंड अधिक अनुकूल आहे.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
webdunia
गृहसौख्य व आरोग्यमान... 
तुम्ही चाणाक्ष आणि फलदायी निर्णय घ्याल. तुमचे आरोग्य ठणठणीत असेल आणि तुमच्या जुन्या आजारांवर तुम्ही मात कराल. तुम्ही धार्मिक कार्ये कराल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अधिक प्रेम आणि जवळीक निर्माण होईल. पण, पहिले दोन महिने खूप आव्हानात्मक असतील, कारण या कालावधीत तुमच्या जोडीदारासोबत वाद किंवा आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जे प्रेमाच्या नात्यात आहेत, त्यांना या वर्षी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्यांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी मेहनत करतील आणि मुले काहीशी चिडचिडी होतील. पण, तुमचे प्रेम आणि काळजी यामुळे त्यांची भरभराट होईल. एकुणात, हे वर्ष तुमच्यासाठी सकारात्मक आणि प्रगतिशील आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मीन राशीच्या जातकांचे वर्ष 2018चे संपूर्ण वार्षिक राशीभविष्यफल