Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

Love Horoscope 2020 प्रेम राशिभविष्य: सिंह

सिंह
, बुधवार, 4 डिसेंबर 2019 (17:21 IST)
सिंह राशीच्या जातकांसाठी हे वर्ष अनेक बदल घेऊन येत आहे. आपल्यामधून काही लोकांना प्रिय साथीदार मिळू शकतात तर काही लोकांचं ब्रेकअप झाल्यावर दुसरा साथीदार मिळण्याची शक्यता आहे. आपण एकाहून अधिक रिलेशनमध्ये गुंतलेले असाल अशा स्थिती देखील येऊ शकते. म्हणून या वर्षी आपल्या प्रेम जीवनात चढ-उतार बघायला मिळतील. 
 
प्रेमाची आपल्या जीवनात कधीच कमी भासणार नाही तरी काही कारणांमुळे आपल्याला संतुष्टी जाणवणार नाही. या दरम्यान आपल्या साथीदाराला अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा, पार्टनरच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तरी अती आतुरता योग्य नाही म्हणून नेहमी स्वतः: पुढाकार घेण्याची सवय टाळा आणि पार्टनरच्या जीवनात आपलं अती महत्त्व असल्याचे प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतः:ला महत्त्वपूर्ण समजल्यास अपयश हाती लागू शकतं. म्हणून पार्टनरला देखील महत्त्व द्या.
 
या वर्षाच्या शेवटी प्रेम जीवनात अचानक काही बदल जाणवतील. या दरम्यान सुख आणि दुःखाचे क्षण येतील. परंतू हा काळ प्रेमात आकंठ बुडून जाण्यासाठी उत्तम ठरेल. जानेवारी ते मार्चपर्यंत तसेच जुलै ते मध्य नोव्हेंबर 
 
पर्यंतचा काळ प्रेम जीवनासाठी सर्वोत्तम राहील. या दरम्यान आपण आपल्या साथीदाराशी जुळाल आणि जीवनातील महत्त्वपूर्ण क्षण एकमेकांसोबत घालवाल. या दरम्यान काही भाग्यवान लोकं प्रेम विवाह बंधनात देखील अडकतील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Love Horoscopes 2020 प्रेम राशिभविष्य: कर्क