Publish Date: Sat, 21 Dec 2019 (13:42 IST)
Updated Date: Sat, 21 Dec 2019 (13:43 IST)
मूलांक 8 असलेल्या व्यक्तींच्या जीवनात शनीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अंक शास्त्र 2020 नुसार आपण आपल्या कामाबद्दल थोडा आळशी होऊ शकता, तरी ह्या वर्षी आपण आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नवा पुढाकार घ्याल आणि आयुष्यात पुढे वाटचाल कराल.
आपल्याला आळस सोडणे फायदेशीर ठरेल. बऱ्याच दिवसांपासूनची योजना कार्यान्वित होतील आणि त्यात नफा मिळेल. आपल्याला आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास संपादित करण्यासाठी परिश्रम घेण्याची गरज आहे. सर्वांशी सलोख्याने वागा. संततीची प्रगती बघून आनंद होईल.
आपण विद्यार्थी असल्यास परीक्षेत चांगला निकालासाठी अथक परिश्रम करावे लागतील. ह्या वर्षी वेळेचे बंधन पाळल्यास यश संपादन होईल. आपल्या कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगावी लागेल. विरोधकांपासून सतर्क राहा. हे वर्ष ह्या मूलकांच्या लोकांसाठी सामान्य असणार आहे.