माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...
बाबांच्या आयुष्यातील ठळक टप्पे
बाबा तथा मुरलीधर देवीदास आमटे
जन्म - २६ डिसेंबर १९१४
१९५८ - रॅमन मॅगसेसे पुरस्कार
१९८६ - पद्मविभूण, पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार
१९८८ - मानवी हक्क पुरस्कार .
१९९० - टेंपल्ट पुरस्कार .
१९९१ - राईट लाइव्हली हुड पुरस्कार .
पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार .
१९९९ - म. गांधी पुरस्कार .
कुष्ठरोग्यांसाठी संस्था स्थापन केल्या -
सोमनाथ - मूल(चंद्रपूर)
आनंदवन - वरोरा (चंद्रपूर)
अशोकवन - नागपूर
नागेपल्ली, हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प.
'ज्वाला आणि फुले' हा काव्यसंग्रह
'उज्ज्वल उद्यासाठी' (काव्य)
'माती जागवील त्याला मत'
थोर समाजसुधारक
कुष्ठरोग निर्मूलन , पुनर्वसन
आनंदवन मूळच्या खडकाळ जमीनीत शेतीविषयक विविध प्रयोग.
राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते
१९८५ - शंभर दिवसांचे भारत जोडो आंदोलन .
नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व
सामाजिक नैसर्गिक पर्यावरण क्षेत्रात सक्रिय कार्य.