Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरगुती उपायांनी घालवा कोंडा

घरगुती उपायांनी घालवा कोंडा
डँड्रफ म्हणजेच केसातला कोंडा ही जवळपास प्रत्येक महिलेची समस्या आहे. या कोंड्यामुळे डोक्याला खाज सुटतेच पण काळ्या किंवा इतर गडद  रंगाच्या कपड्यांवर पडलेला डँड्रफ इतरांच्या नजरेत भरतो. कितीही उपाय केले तरी कोंडा परत येतो. जाहिरातीतले शँपूही काही उपयोगाचे नसतात. ते फक्त डँड्रफ धुतात. हा कोंडा कायमचा घालवण्याचे उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत. या स्वस्त आणि मस्त उपायांनी कोंड्याची समस्या कायमची सोडवा. 
 
* अॅपल व्हिनेगर कोंड्यावर फारच गुणचारी आहे. या व्हिनेगारमधल्या आम्लामुळे तुमच्या स्कॅल्पचा पीएच बॅलन्स सांभाळला जातो. यामुळे कोंड्याची वाढ होत नाही. नियमित वापरामुळे कोंडा कायमचा दूर होतो. 
 
* केस ओल करून त्यावर खायचा सोडा चोळा. तुमच्या डोक्याच्या त्वचेवर हा सोडा लागू द्या. त्यानंतर शँपू लावू नका. बेकिंग सोड्यामुळे फंगस कमी होते आणि कोंडाही तयार होत नाही. 
 
* खोबरेल तेलही कोंड्यावर फारच गुणकारी आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा खोबरेल तेलाने मसाज करा. दुसर्‍या दिवशी शँपूने केस धुवा. 
 
* दोन चमचे लिंबाच्या रसाने तुमच्या केसांना मसाज करा आणि पाण्याने केस धुवून टाका. त्यानंतर शँपू लावा. मग कपभर पाण्यात लिंबाचा रस घालून त्या पाण्यानं पुन्हा केस धुवा. तुम्ही केस धुणार असाल तेव्हा ते अशाप्रकारे धुवा. पुन्हा लिंबाचा रस लावल्यानंतर शँपू लावू नका. 
 
* लसूणातही जंतूसंसर्ग बरा करण्याची क्षमता असते. लसणामुळे तुमच्या स्कॅल्पवरचा फंगस नष्ट होतो. म्हणून केस धुण्याआधी लसूण पेस्ट आणि मध यांचं मिश्रण केसांना लावा. कोंड्यापासून नक्कीच आराम मिळेल आणि केस चमकदार होतील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओनियन पराठे