Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळा आणि सौंदर्य!

उन्हाळा आणि सौंदर्य!
सुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतो. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुम्ही घरगुती व बाजारात मिळणार्‍या दोन्ही प्रकारच्या प्रसाधनांचा वापर करू शकता.

उन्हापासून बचा
उन्हात बाहेर जाणे गरजेचे असेल तर सन स्क्रीन लोशन लावून बाहेर पडायला पाहिजे व छत्रीचा वापर करावा. ऊन आणि प्रदूषणामुळे केसांचे आरोग्य फारच खराब होते म्हणून केसांना बांधूनच बाहेर जाणे योग्य.

काही खास उपाय :

केसांसाठी : केसांचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी प्रत्येक 15 दिवसांनी मेंदी लावायला पाहिजे. मेंदी कंडिशनरचे काम करेल. त्याशिवाय आठवड्यातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर केला पाहिजे.

बेसन, लिंबाचा रस आणि दही या तिघांना सम मात्रेत घेऊन केसांचे मसाज करून डोकं धुवायला पाहिजे. सर्वात शेवटी केसांना लिंबाच्या पाण्याने फाइनल रिंस करावे.

1 वाटी मेंदीत आवळा, शिकाकाई, रिठा, मेथी, कडू लिंब, तुळशीचे पानं सर्वांना 1-1 चमचा घेऊन दह्यात मिसळावे, त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून केसांना लावून 1 तास तसेच राहू द्यावे, याने केस मजबूत होतील व केसांना चमक येईल.

थोडं गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने केसांना धुऊन टाकावे. कोरड्या केसांमध्ये वेगळीच चमक येऊन ते मऊ होतील.

webdunia
 
ND
त्वचेसाठी : उन्हाळ्यात चेहरा ताजातवाना राखण्यासाठी दोन चमचे बेसन, हळद, गुलाब पाणी व मध घालून त्याचा लेप बनवून चेहरा, हात-पाय आणि मानेवर लावून 10 मिनिटाने धुऊन टाका. त्याने त्वचा सुंदर व स्वस्थ बनेल.

डोळ्यांची आग व 'डार्क सर्कल' कमी करण्यासाठी रात्री झोपताना डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्ट्या ठेवाव्या.

ओठांना सुंदर व मऊ बनविण्यासाठी रात्री झोपताना दुधाची साय लावायला पाहिजे, सकाळी थंड पाण्याने धुऊन टाकावे.

दुधात हळद घालून त्याची पेस्ट तयार करावी, या पेस्टला चेहरा आणि हाता-पायावर लावावे. 10 मिनिटाने धुऊन टाकावे.

8-10 दिवसाने एकदा चेहऱ्यावर वाफ जरूर द्यावी. या पाण्यात पुदिनाची पानं, तुळशीचे पानं, लिंबाचा रस व मीठ घालावे. वाफ घेतल्यानंतर याच कोमट पाण्यात 5 मिनिट हात ठेवावे त्याने हातसुद्धा मऊ होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्युटी टिप्स : Try This