Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपयोगी पडणार्‍या ब्युटी टिप्स

उपयोगी पडणार्‍या ब्युटी टिप्स
स्टीम बाथ घेण्यापूर्वी शक्य तितके जास्त पाणी प्यावे म्हणजे डीहायड्रेशनचा त्रास होणार नाही
 
नाक, तोंडावर कपडा बांधून स्वयंपाकघराची स्वच्छता केल्याने धुळीचे कण शरीरापर्यंत पोहचत नाहीत.
 
कैरीच्या कच्च्या पांढर्‍या बिया, मेंदी, कडूलिंबाची पावडर यांचे मिश्रण केसांकरिता उपयोगी असते.
 
नेल ब्लिच तयार करताना सायट्रिक अ‍ॅसिड किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर साधारणपणे केला जातो. 
 
रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी व ग्लिसरीन लावून झोपायला पाहिजे. हात-पाय मऊ व चकचकीत होतात.
 
स्विमिंग करताना स्विमिंग कॅप वापरावी. कारण पूलच्या पाण्यात क्लोरीन जास्त असल्यामुळे केस खराब होतात. 
 
केसांमध्ये हेअर ड्रायरचा वापर कमीत कमी करावा. कारण, केस गळण्यास सुरूवात होते तसेच ते द्विभाजीतही होतात.
 
नॅचरल मेकअपसाठी फाउंडेशन लावल्यानंतर 2 मिनिटानंतर पावडर लावायला पाहिजे. त्याने फाउंडेशनमुळे पडणारे चकते दिसणार नाही.
 
जरदौसी मेंदी सिल्व्हर किंवा गोल्डन शेडमध्ये असते. मेंदीने हातांवर सिल्व्हर किंवा गोल्डन रंगाने डिझाइन बनवण्यात येते.
 
समुद्र चौपाटी किंवा एखाद्या डोंगरावर ट्रेकिंगला जाण्‍याचा प्लॉन करत असल तर आल्या त्वचेची काळजी घ्यायला विसरू नका.
  
गुडघ्यापर्यंत मिडी किंवा मिनी स्कर्टसोबतसुद्धा लॅगिंग्सचा वापर करता येतो. लाँग स्कर्टसोबत स्लॅक्ससारखे याला वापरू शकता. 
 
हातापायांवरील व्रण, डाग घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर पाच ते सात मिनिटांसाठी चोळा. हा उपाय दिवसातून दोनदा सात दिवस तरी करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi