Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केस कोरडे होण्याची कारणे

केस कोरडे होण्याची कारणे

वेबदुनिया

केसांच्या मुळाशी असलेल्या तेल ग्रंथी अनेकदा पुरेशा कार्यक्षम नसल्याने त्या योग्य प्रमाणात सीबम तयार करू शकत नाहीत आणि केस कोरडे राहतात. साबण किंवा तीव्र शॅंपूचा अनियमित आणि अनियंत्रित वापर, यामुळेही केस, कोरडे होऊ शकतात. 

तेल, कंडिंशनिंग किंवा हेअर माँइश्चरायझर न वापरता केवळ अनेकदा केस धुतल्यानेही केस कोरडे होतात. वाहनांवरून प्रवास करताना केस व्यवस्थित झाकले जातील याची काळजी घ्यायला हवी.

खूप वाऱ्याच्या संपर्कात आल्यानेही केस कोरडे आणि निस्तेज होतात. कोरड्या केसांची निगा आठवड्यातून किमान दोनदा केसांना आणि टाळूला तेल लावून हलका मसाज करावा. नारळाचे, तिळाचे किंवा खोबऱ्याचे तेल वापरण्याऐवजी कॉर्न ऑईलचा वापर करावा.

केसांना रात्री तेल लावावे व सकाळी शॅंपू करून हे तेल काढून टाकावे. शॅंपू करून झाल्यानंतर लगेच कोरड्या केसांसाठी उपयुक्त अशा कंडिशनरचा वापर करावा. कोरडे केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. थंड पाण्यात थोडे गरम पाणी घालून अर्थात कोमट अशा पाण्याने केस धुवावेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi