Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरगुती सोपे फेसपॅक

घरगुती सोपे फेसपॅक
काकडी- लिंबचा पॅक: काकडी आणि लिंबाचा रस एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहर्‍यावर लावा. 30 मिनिटांनतर धुवून टाका.

बेसन- हळदी पॅक: एक चमचा बेसनात दूध आणि गुलाबपाणी मिसळा. चिमूटभर हळद टाकून हा पॅक चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटानंतर धूवून टाका. रंग उजळेल.
webdunia

पपई- मध पॅक: मुरूम आणि डाग घालवण्यासाठी पपईच्या गरात मध मिसळून चेहर्‍यावर लावा. 15-20 मिनिटाने धुऊन टाका.
webdunia

कोरफड पॅक: कोरफडीच्या गरात अर्धा चमचा तांदळाचं पीठ मिसळा. चेहर्‍यावर लावून 15 मिनिट राहू द्या. याने काळे डाग दूर होता. ऑइली त्वचेसाठी हा फायद्याचा ठरेल.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीले चपाती