Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थ्रेडिंग करताना अशा पद्धतीने घ्या काळजी

थ्रेडिंग करताना अशा पद्धतीने घ्या काळजी

वेबदुनिया

थ्रेडिंग म्हणजे धाग्याच्या साहाय्याने त्वचेनरील केस काढने. या प्रकारात आपण भुवईला आकार देणे तसेच अप्पर लिप्स काढने असेही म्हटले जाते. कपाळ, हनुवटी तसेच चेहर्‍यावरील इतर भागावर याचा वापर केला जातो. तसेच हाता-पायावरील केसही थ्रेडिंगच्या साहाय्याने काढले जातात.

थ्रेडिंग करण्यासाठी 40 क्रमांकाचा कॉटन अथवा 'वर्धमान' कंपनीच्या धाग्याचा वापर केला जातो. या प्रक्रियेत केस उलट्या दिशेने काढले जातात.

थ्रेडिंग कशी करावी व त्याची काळजी कशी करावी यासाठी लागणार्‍या आवश्यक बाबी पुढीलप्रमाणे-
1) थ्रेडिंग करण्यापूर्वी ती जागा डेटॉल किंवा अँस्ट्रोजनच्या साहाय्याने चांगल्याप्रकारे स्वच्छ करावी.
2) त्यानंतर पावडर लावावी त्यामुळे आपल्या चेहर्‍यानरील घाम तसेच तेल कमी होण्यास मदत होईल.
3) थ्रेडिंग केल्यानतंर जर रँशेज किंवा त्वचा लाल झाल्यास त्यावर सोप्रोमाईसिल किंवा मॉयच्छराइजर लावावे. 

पुढे पहा चेहर्‍यानुसार आकार कसा द्यावा -


webdunia
WD
चेहर्‍यानुसार आकार कसा द्यावा -
1) आंडाकार चेहरा- चेहरा लांबोळा असेल अशा चेहर्‍यावर छोट्या आणि थोड्या जाडसर आयब्रो सूट होतात.

2) गोल चेहरा- गोल चेहरा असणार्‍या महिलांचे कपाळ हे मोठे असते. अशा चेहर्‍यावर लांब आणि बारीक टोकदार तसेच खाली झुकलेली भुवई चांगली दिसते.
3) चौरस चेहरा- चौरस चेहरा असणार्‍या महिलांचे कपाळ लहान असते. अशा चेहर्‍यावर अर्ध चंद्राकार आयब्रो चांगली दिसेल.
4) त्रिकोणी चेहरा- अशा महिलांचे कपाळ छोटे असते. त्यामुळे अशा चेहर्‍यावर जाड पसरट भुवया सुंदर दिसतात
5) पंचकोणी चेहरा- उंच कपाळ असेल तर सरळ भुवया तसेच जास्त लांब नसाव्यात तसेच टोकाला थेड्या बरीक असाव्यात .
6) नाक बारीक असलेल्या महिलांसाठी- नाक बारीक असेल तर भुवया डोळ्याच्या जास्त वर न घेता नाकाच्या जवळून सुरुवात करावी ज्यामुळे डोळे लहान दिसणार नाहीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरगुती उपायांनी घालवा कोंडा