Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नखांची काळजी कशी घ्यावी

नखांची काळजी कशी घ्यावी
हेल्दी आणि स्टायलिश नखं तुमचं सौंदर्य आणखीन खुलवतात. म्हणूनच नखांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. नखांची काळजी कशी घ्यावी याच्या काही टिप्स :
* रोज गाजराचा रस पिणं नखांना कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळवून देईल. यामुळे नखं मजबूत होण्यास मदत होते.
* क्युटिक्लस काढण्यासाठी / कापण्यासाठी मेटल इन्स्ट्रूमेण्टचा वापर करू नका.
* नखं लांबच लांब वाढवण्यापेक्षा त्यांना शेप द्या
* आंघोळ केल्यानंतर मॅनिक्युअर करणं उत्तम. अशा वेळी नखांमधला मळ निघालेला असतो आणि नखंही नरम झालेली असतात.
* नखांना शेप देण्यासाठी फायलरचा वापर करा.
* नियमितपणे मॅनिक्युअर करा.
* नखं कापण्यापेक्षा फायलरने शेप करणं अधिक योग्य.
* नखांना नेलपेण्ट लावून नखांचं सौंदर्य आणखी वाढवता येईल.
* नखांच्या टोकांचं रक्षण करण्यासाठी नेहमी टॉप कोट लावा.
* नेलपेण्ट काढण्यासाठी रिमूव्हरचा वापर आठवड्यातून एकदाच करणं अधिक फायदेशीर. अधिक प्रमाणात रिमूव्हरचा वापर केल्यास नखं कोरडी होऊ शकतात.
* हात धुतल्यावर लोशन किंवा क्रीम लावून हाताची स्किन आणि नखांना मॉइश्चरायझर मिळेल याची काळजी घ्या. क्युटिकल्सना मॉइश्चरायझर मिळावं यासाठी व्हॅसलिन किंवा मॉइश्चरयाझरयुक्त क्रीमचा वापर करा. झोपण्यापूवीर् मॉइश्चरायझर लावा.
* क्युटिक्लस काढण्यासाठी / कापण्यासाठी मेटल इन्स्ट्रूमेण्टचा वापर करू नका.
* नेलपेण्ट खरवडून काढू नका. यामुळे नखावरील संरक्षणात्मक पेशी (प्रोटेक्टिव सेल्स) निघू शकतात.
* नखं चावू नका.
* चार ते सहा आठवड्याने एकदा प्रोफेशनल्सकडून मॅनिक्युअर करून घ्या.
* क्युटिकल्समुळे बॅक्टेरियापासून नखाच्या मुळांचं रक्षण होतं. म्हणून क्युटिकल्स कापण्यापेक्षा रोझवूड स्टिक/रबर टिप असणाऱ्या क्युटिकल पूशरने क्युटिकल्स नीट मागे करून घ्या. क्युटिकल रिमूव्हरचा वापर करणं अधिक योग्य.
* नखं मजबूत होण्यासाठी संतुलित आहार घ्या. यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन असेल याची काळजी घ्या. फळांचं प्रमाणही योग्य ठेवा.
* पाणी आणि इतर दवपदार्थांचं प्रमाण योग्य ठेवा.
* नखं खूप लांब वाढवू नका. लांब नखांमध्ये मळ साठू शकतो. यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे.
* नखं साफ करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे साधारण गरम पाण्यात हात पाच-सहा वेळा साबणाने स्वच्छ धुवा आणि फार टोकदार नसणाऱ्या फायलरने नीट शेप द्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्युटी पार्लर तुमच्याच स्वयंपाकघरात