Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शॅम्पू निवडताना काळजी घ्या!

शॅम्पू निवडताना काळजी घ्या!
बाजारात शॅम्पू घ्यायला गेल्यावर अनेक पर्याय समोर येतात. बहुसंख्य लोक जास्तीत जास्त आकर्षिक वेस्टनातील शॅम्पू खरेदी करताना दिसतात. मात्र ही अतिशय चुकीची पद्धत आहे. केसांचे पोत लक्षात घेऊन शॅम्पूची निवड करावी. 
 
केस तेलकट असतील तर ऑईल कमी करणारा शॅम्पू निवडणे योग्य. यातली अमोनियम लॉरेल सल्फेटची मात्रा त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. 
 
स्टायलिंग प्रॉडक्ट वापरत असल्यास क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरा. यामुळे डिप क्लिंझिग होऊन स्टायलिंग प्रॉडक्टमध्ये वापरण्यात येणार्‍या रसायनांचे दुष्परिणाम कमी होतात. 
 
केस कलर केलेले असल्यास कलर रिफ्रेशर शॅम्पू वापरा. हे शॅम्पू व्हेजिटेबल डायपासून बनवलेले असतात. या शॅम्पूच्या वापरामुळे केसांना आगळीच चमक येते. यातील अल्ट्राव्हॉयलेट फिल्टर्स प्रखर सूर्यप्रकाशापासून रंगवलेल्या केसांचे रक्षण करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi