गव्हाचा कोंडा :
गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहऱ्यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो.
तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घ्यावे.
एक चमचा मध.
एक चमचा काकडीचा रस
एक चमचा संत्र्याचा रस.
हे सर्व मिक्स करुन चेहऱ्याला लावणे. १५-२० मिनिट लावणे. याचा क्रिम म्हणून उपयोग होतो.
जायफळ पाण्यत उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे.
टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डग व वर्तुळे कमी होतात.
पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळुन जाडसर भार चेहऱ्यावर देणे.टोमॅटोच्या आतील गर स्मॅश करुन चेहऱ्यावर लावणे. चेहऱ्यावर चमक येते व चेहरा निखरतो.चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.चेहऱ्यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे.
सर्दी खोकला असेल तर नेपाली अमृता काढा दिवसातून दोनदा, ३ दिवस घेणे. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून रक्षण करण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्याला लावून बाहेर पडणे.केस गळत असेल तर जास्वंद जेलने केसांची मसाज करणे.कोरफड जेलने केसांची मसाज केल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना चमक येतो.