Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

5 types of facials : ग्लोसाठी फेशियलचे 5 प्रकार

facial
, बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (10:36 IST)
सण असो व लग्नसराई, खरेदी व इव्हेंद प्लॅनिंग नंतर एक आणखी गोष्ट आहे जी विसरून चालत नाही. ती म्हणजे पॉर्लर जाण्याची तयारी. त्यात हा प्रश्न पडतो की सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी कोणते फेशियल योग्य ठरेल. अशा वेळी प्रदुषणामुळे टॅन झालेल्या त्वचेला वेगवेगळ्या प्रकाराचे फेशियल्स नवसंजीवनी देतात. त्वचेचं सौंदर्य खुलवणार्‍या फेशियलसंबंधी थोडंसं...

फ्रुट फेशियल- फेशियलचा बेसकि प्रकार म्हणून या फेशियलकडे पाहिलं जातं. साईड इफेक्ट नसल्याने फेशियलचा हा प्रकार तरुणींमध्ये लोकप्रिय आहे.
 
इलेक्ट्रिक शॉक फेशियल- हे फेशियल थोडी भीती वाटायला लावणारं आहे. मायक्रो करंटची निर्मिती करून हे फ‍ेशियल केलं जातं. मध्यमवयीन स्त्रियांसाठी हे फेशियल अत्यंत उपयुक्त आहे.
 
पॅराफिन फेशियल- सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय असणारं फेशियल म्हणून या फेशियलकडे पाहिलं जातं. हे फेशियल युक्तींसाठी फायदेशीर ठरतं.
 
गॅल्वहोनिक फेशियल- रूक्ष आणि निर्जीव त्वचेसाठी गॅल्वहोनिक फेशियल वरदान ठरू शकतं. त्वचा पुन्हा ताजी टवटवीत करण्याचं काम या फेशियलद्वारे केलं जातं.
 
ऑईल फ्री फेशियल- तेलकट आरि डागविरहीत त्वचेसाठी ऑईल फ्री फेशियल वरदान ठरू शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kande Pohe Recipe कांदे पोहे रेसिपी