Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केसांना घनदाट आणि लांब करण्यासाठी पपईचे हेयर पॅक लावा

केसांना घनदाट आणि लांब करण्यासाठी पपईचे हेयर पॅक लावा
, मंगळवार, 22 जून 2021 (09:00 IST)
लांब केस सर्वानाच आवडतात,पपईचे आरोग्यासाठी चे फायदे आहे या शिवाय पपईचा वापर केसांवर केल्यावर केस निरोगी,सुंदर,घनदाट आणि लांब होतात.चला तर मग पपईच्या हेयर पॅक बद्दल जाणून घ्या.
 
1 पपई आणि कोरफडचा हेयर पॅक - पपईरस 2 मोठे चमचे ,2 मोठे चमचे कोरफड जेल एकत्र मिसळून केसांच्या स्कल्पवर त्याची मॉलिश करा आणि तास भर तसेच ठेवा.शॉवर कॅप ने डोक्याला झाकून घ्या.नंतर शॅम्पूने आणि कंडिशनरने केसाना धुवून घ्या.आठवड्यातून एकदा लावल्याने चांगला परिणाम मिळतो.या मुळे केस वाढतात आणि केसातील कोंडा कमी होतो.
 

2  पपई आणि नारळाच्या दुधाचा हेयर पॅक - या साठी 1/2 कप पिकलेली पपई घ्या आणि 1/2 कप नारळाचं दूध 1 चमचा मध घेऊन एकत्र करून पेस्ट बनवा.केसांना शॅम्पू करून ही पेस्ट केसांना लावा.शॉवर कॅप ने कव्हर करा. हे हेयर पॅक 30-45 मिनिटे तसेच ठेवा नंतर केसांना कोमट पाण्याने धुवून घ्या.पपईचे हे हेयर पॅक आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा वापरा.या मुळे केसांचे मुळ बळकट होतात.केसांची वाढ होते.
 

3 पपई आणि कडी पत्ता आणि व्हिटामिन ई हेयर पॅक - या साठी 2 मोठे चमचे पपईचा रस,10 ते 12 पान कडी पत्ता,2 मोठे चमचे व्हिटॅमिन ई घेऊन गरम करून तेल बनवून घ्या आणि या तेलाने केसांची मॉलिश करा आणि एक ते दोन तास तसेच ठेवा.नंतर शँम्पूने केस धुवून घ्या.या मुळे केसांची गळती थांबते आणि केसांची वाढ होते. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिम कार्डचा एक कोपरा का कापलेला असतो जाणून घ्या