उन्हाळा सुरु झाला आहे. तसचे त्वचेच्या समस्या देखील सुरु होतात. उन्हाळ्यामध्ये घाम येतो, चेहरा ऑईली होतो, पुरळ येतात, त्वचेची जळजळ यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. हे पाहायला मिळते की, त्वचेला उन्हापासून वाचवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स वापरतात. जेव्हा की, तुम्ही नैसर्गिकरित्या त्वचेची काळजी घेऊ शकतात. या वातावरणात त्वचेला थंडावा येऊन त्वचेला उजळ बनवण्यासाठी फेसपॅकचा वापर करू शकतात. जर तुम्ही रोजमेरी आणि पुदिन्याच्या मदतीने फेसपॅक बनवला तर तुमच्या त्वचेला खूप फायदा मिळेल.
*रोजमेरी-पुदिना हाइड्रेटिंग फेसपॅक
उन्हाळ्यामध्ये सारखा घाम येतो व त्यामुळे त्वचेला अतिरिक्त हाइड्रेशनची गरज असते. अश्यावेळेस हा फेसपॅक तुम्ही वापरू शकतात.
आवश्यक साहित्य-
2 मोठे चमचे रोजमेरी
2 मोठे चमचे पुदिन्याची पाने
1 मोठा चमचा मध
1 मोठा चमचा साधे दही
उपयोग कसा करावा-
सर्वात पहिले रोजमेरी आणि पुदिन्याची पाने यांना एकत्र बारीक करून घ्या. आता या पेस्टमध्ये मध आणि दही टाकून चांगले मिक्स करा. तयार मिश्रणाला चाऱ्यावर आणि मानेवर लावावे. याला 15-20 मिनट लावून ठेवावे. नंतर कोमट पाण्याने धुवावे आणि हलक्या हाताने पुसावे.
*रोजमेरी-पुदिना क्लींजिंग फेसपॅक
उन्हाळ्यात त्वचेला डीप क्लीन करण्यासाठी तुम्ही या फेसपॅकचा उपयोग करू शकतात.
आवश्यक साहित्य-
1 मोठा चमचा कोरडी रोजमेरी
1 मोठा चमचा वाळलेले पुदिन्याची पाने
1 मोठा चमचा ओटमील
आवश्यकतेनुसार गुलाब जल
कसा करावा उपयोग
एका बाऊलमध्ये कोरडी रोजमेरी, पुदिन्याचे पाने आणि ओटमील मिक्स करा. आता यामध्ये थोडे गुलाबजल मिक्स करा. म्हणजे एक मऊ फेसपॅक बनेल. आता तयार केलेल्या फेसपॅकला चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. याला 15-20 पर्यंत लावून ठेवावे. मग कोमट पाण्याने धूवावे व हलक्या हाताने पुसावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
Edited By- Dhanashri Naik