Beauty Care Tips : त्वचेवर विविध प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरली जातात. काही उत्पादनांमुळे त्वचेला फायदा होतो, तर काहीं मुळे नुकसान होते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. काही लोकांची त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असते. हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या जास्त वाढते. अशा स्थितीत त्वचेला मॉइश्चरायझ करणे गरजेचे आहे. त्वचा मऊ करण्यासाठी क्रीम आणि जेलचा वापर केला जातो. त्यासाठी हिवाळ्यात चेहऱ्यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. कोरड्या त्वचेपासून ते तेलकट त्वचेसाठी ग्लिसरीनचा वापर केला जाऊ शकतो. ग्लिसरीन त्वचेसाठी फायदेशीर आहे.
ग्लिसरीन भाज्या आणि प्राण्यांच्या चरबीपासून बनवले जाते. ते दिसायला स्पष्ट आणि रंगहीन आहे. ग्लिसरीनमध्ये कोणत्याही प्रकारचा सुगंध नसतो. हे एक प्रकारचे मॉइश्चरायझर आहे, जे चेहऱ्यावर वापरले जाते.त्वचा कोरडी असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ग्लिसरीन वापरू शकता. ग्लिसरीन नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेवर ग्लिसरीन लावावे .
त्वचेला जास्त एक्सफोलिएट केल्यामुळे स्क्रीन बॅरियर खराब होतो. एवढेच नाही तर रासायनिक पदार्थ आणि औषधांच्या दुष्परिणामांमुळेही ही समस्या उद्भवू लागते. स्क्रीन बॅरियर खराब होऊ नये या साठी ग्लिसरीनचा वापर करावा.
त्वचेचा रंग सुधारण्यासाठी बाजारात विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. रंग उजळण्यासाठी उपचारही केले जातात. ग्लिसरीन सारख्या काही ब्युटी प्रोडक्टमुळे देखील त्वचा स्वच्छ दिसते.रंग ही उजळतो.
फेस सीरम त्वचेला ग्लोइंग करण्यापासून ते तरुण ठेवण्यापर्यंत काम करते.ग्लिसरीनच्या मदतीने तुम्ही घरी सहज फेस सीरम बनवू शकता.
फेस सीरम बनवण्यासाठी ग्लिसरीनच्या पाच थेंबांमध्ये एका लिंबाचा रस पिळून घ्या.
आता त्यात 20 मिमी गुलाबजल टाका.
हे द्रव स्प्रे बाटलीत साठवा.
आता ग्लिसरीनपासून बनवलेले फेस सीरम तयार आहे.
हे सीरम दररोज वापरू शकता.
सीरम चेहऱ्यावर लावण्यासाठी कापूस किंवा बोटांनी वापरा.
हे सीरम रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
क्लीन्सर म्हणून तुम्ही ग्लिसरीन वापरू शकता. ग्लिसरीनमध्ये दूध मिसळा आणि त्यानं चेहरा स्वच्छ करा.
स्क्रबिंगसाठीही ग्लिसरीन फायदेशीर आहे. 1 चमचे साखरेत 2 चमचे ग्लिसरीन मिसळा आणि चेहऱ्याला चोळा.
त्वचेला मॉइश्चरायझेशन ठेवण्यासाठी तुम्ही साधे किंवा ग्लिसरीनमध्ये मिसळलेले व्हिटॅमिन ई तेल लावू शकता.
टोनर ग्लिसरीनपासूनही बनवता येतो. चेहऱ्यावर टोनर लावल्याने मेकअप चांगला मिसळतो. टोनर छिद्र कमी करण्यास देखील मदत करते. ग्लिसरीनपासून टोनर बनवण्यासाठी त्यात गुलाब पाणी घाला.
निरोगी त्वचेसाठी तुम्ही ग्लिसरीन वापरू शकता, परंतु प्रमाण लक्षात ठेवा. कोणत्याही गोष्टीचा जास्त वापर केल्याने नुकसान होते.
ग्लिसरीन लावण्यापूर्वी हे करा
चेहऱ्यावर ग्लिसरीन वापरण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा, जेणेकरून हे उत्पादन तुमच्या त्वचेला शोभेल की नाही हे कळू शकेल. जर तुमची त्वचा ग्लिसरीनसाठी संवेदनशील असेल तर त्वचेवर लालसरपणा दिसू लागतो. कधीकधी त्वचेला सूज येऊ लागते. याशिवाय खाज येण्याची समस्याही उद्भवू शकते.