फुलं नैसर्गिक सौंदर्याचा खजिना असतो. निसर्गाचं सौंदर्य वाढवणारी फुलं आपल्या त्वचेचंही सौंदर्य वाढवू शकतात. गुलाबाच्या फुलांचा यासाठी पुरेपूर वापर केला जातो तसेच जास्वंद व्हिटामिन सी ने पुरेपूर असून त्वचा आणि केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. पाहू याचे फायदे:
पुढे वाचा केसांसाठी जास्वंद...
* थोड्याश्या पाण्यात 5-6 जास्वंदीची फुलं 2 मिनिटे उकळून त्या पाण्याने केस धुवा. हे कंडिशनरचे काम करेल.
* पाव लीटर खोबरेल तेलात 10 जास्वंदीची फुलं, मेथीदाणा उकळून घ्या. 8 ते 10 तास असेच ठेवून मग तेल गाळून घ्या. हे तेल लावल्याने केस दाट होतात आणि काळे राहण्यास मदत होते.
* जास्वंदीच्या पाकळ्यांचा बारीक केलेला चोथा केसांच्या मुळांना लावून दोन तासाने केस धुतल्याने केस मऊ आणि चमकदार होतात.
पुढे वाचा त्वचेसाठी जास्वंद...
सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचा स्वस्थ आणि टवटवीत दिसण्यासाठी जास्वंदीच्या पाकळ्यांची पेस्ट, 1 चमचा तांदळाचं पीठ, 4-5 थेंब व्हिटामिन ई तेलाचे आणि 1 चमचा दूध मिसळून लेप तयार करा आणि 15 मिनिटे चेहर्यावर लावा.