Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिवाळ्यात हळदीचे उटणे लावण्याचे फायदे जाणून घ्या

हिवाळ्यात हळदीचे उटणे लावण्याचे फायदे जाणून घ्या
, बुधवार, 23 डिसेंबर 2020 (10:43 IST)
डागांशिवाय चमकणारी त्वचा कोणाला आवडत नाही पण सगळ्यांकडेच अशी त्वचा नसते. याच्या मागे अनेक कारणे आहेत, चेहऱ्यावर केमिकलचे वापर करणे या साठी प्रमुख कारणे आहे या मुळे चेहऱ्यावरील चमक दिवसेंदिवस आपले सौंदर्य गमावू लागते. आज आम्ही आयुर्वेदानुसार अशा औषधांबद्दल सांगत आहोत जे त्वचेसाठी चमकणाऱ्या टॉनिक सारखे आहे. 

हळद ही आरोग्यासह त्वचेसाठी देखील अतिशय गुणकारी मानली जाते. तेलकट, कोरडी, किंवा संवेदनशील तिन्ही प्रकाराच्या त्वचेसाठी हळद एक सौंदर्य किट म्हणून काम करते. चला तर मग जाणून घेऊ या हळदीने त्वचेची काळजी घेण्याचे काही उपाय.
 
* हळदीचे गुणधर्म -
हळदीमध्ये अँटी ऑक्सीडेन्ट, अँटी बॅक्टेरिया आणि अँटी फंगल घटक असतात. जे शरीरास रोगांशी लढण्याची शक्ती देतात. या शिवाय या मध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर, आयरन, मॅग्नेशिअम, झिंक या सारखे पोषक घटक आढळतात.

* हळदीमध्ये अँटिसेप्टिक आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हळदला चंदन आणि लिंबाच्या रसा मध्ये मिसळून फेस पॅक बनवा आणि 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा नंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या. मुरुमाचे डाग देखील 15 मिनिटे हळदीचा पॅक लावल्याने कमी होतात आपण दोन चमचे हरभराच्या डाळीच्या पिठात अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे ताजे दही मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुऊन घ्या.
 
* सरत्या वयाच्या दुष्प्रभावाला रोखण्यासाठी देखील आपण हळदीचा वापर करू शकता. हळद दुधात किंवा दह्यात मिसळून चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये लावा आणि कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या.
 
* चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हळद,तांदुळाची पिठी, कच्चं दूध आणि टोमॅटोचे रस मिसळून लावा आणि अर्धा तास तसेच ठेवा. या नंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PPSC Recruitment 2020: नायब तहसीलदार भरती 78 पदांसाठी अर्ज करा