Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंड्याच्या पांढऱ्या भागापासून बनवलेले मास्कचे 4 फायदे

अंड्याच्या पांढऱ्या भागापासून बनवलेले मास्कचे 4 फायदे
, बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (12:20 IST)
हे आपणास माहीतच आहे की अंडं आपल्यासाठी खूप फायदेशीर असतं. खाण्यासाठीच नव्हे तर सौंदर्यात वाढीसाठी देखील हे फायदेशीर असतं. सौंदर्यासाठी कसे काय? तर अंड्याच्या पांढऱ्या भागापासून बनलेल्या मास्कला चेहऱ्यावर लावल्याने अनेक सौंदर्यवर्धक फायदे मिळू शकतात. 
 
1 स्किन टायटनींग - 
अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये असे गुणधर्म असतात जे त्वचेचे छिद्र घट्ट करण्यास मदत करतात. म्हणून जर आपण अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये लिंबू मिसळून मास्क तयार करून चेहऱ्यावर लावल्यानं उघडे छिद्र बंद होण्यास मदत मिळेल.
 
2 तेलकट त्वचेसाठी उत्तम - 
अंड्याच्या पांढऱ्या भागापासून तयार केलेल्या मास्कला लावल्यानं हे तेलकट त्वचे मधून जास्तीचे तेल बाहेर काढण्यास मदत करेल. स्वच्छ चेहऱ्यावर मास्क लावा आणि काही वेळाने चेहऱ्याला कोमट पाण्याने धुऊन टाका.
 
3 मुरुमांपासून सुटका - 
चेहऱ्यावरील जास्तीचे तेल काढण्याव्यतिरिक्त हा मास्क मुरुमांपासून सुटका देण्यास देखील मदत करतं. ज्या ठिकाणी मुरूम आहे तिथे मास्क काळजीपूर्वक लावा. हे मास्क बनवताना या मध्ये दही आणि हळद मिसळू नका.
 
4 चेहऱ्यावरील केस काढतं - 
हा मास्क चेहऱ्यावरील उगलेल्या लहान लहान केसांना मुळापासून काढण्यास उपयुक्त असतं. या साठी आपल्याला हे करावयाचे आहे की हे मास्क वाळल्यावर आपल्याला ह्याला ओढून काढायचे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

NHM मुंबई मध्ये चिकित्सा अधिकारी आणि ऑडियोलॉजिस्टच्या पदासाठी अर्ज कर