Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेहर्‍यावरील डाग दूर करण्यासाठी 3 नैसर्गिक उपाय

चेहर्‍यावरील डाग दूर करण्यासाठी 3 नैसर्गिक उपाय
घरगुती उपायाने चेहर्‍यावरील डाग दूर केले जाऊ शकतात.
बटाटा- यात व्हिटॅमिन बी कॉमप्लेक्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जिंक आणि फॉस्फोरस आहेत जे स्कीनचा कलर लाइट करण्यात मदत करतात. यात आढळणारे नियासिनामाइड नामक व्हिटॅमिन बी कॉमप्लेक्स त्वचेला ताजेतवाने ठेवण्यात मदत करतं.
विधी- बटाट्याचे स्लाइस करून त्यांना हळू-हळू दहा मिनिटापर्यंत चेहर्‍यावर सरक्युलर मोशनमध्ये रब करा. एक स्लाइस कोरडं झाल्यावर दुसरा स्लाइस वापरा.

लिंबू- लिंबात व्हिटॅमिन सी अँटी- ऑक्सिडेंट सारखं काम करतं जे त्वचेला मेलानिन नामक तत्त्व कमी करण्यात मदत करतं. यात आढळणारे सायट्रिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करून, डेड स्किन काढून चेहर्‍याला ग्लो आणण्यात मदत करतं.
webdunia
विधी- एका बाऊलमध्ये एक मोठा चमचा ब्राउन शुगर आणि एका अंड्याचा पांढर्‍या भाग घ्या. यात एक लहान चमचा लिंबाचा रस मिसळून फेटून घ्या. हे चेहर्‍यावर लावून दहा मिनिटापर्यंत बोटांच्या टोकाने हलक्या हाताने रब करा. वाळल्यावर साध्या पाण्याने धुऊन टाका.

पपई- पपईत पापेन नावाचा एन्जाइम एक्सफोलिएट एजंट असतं. या गुणामुळे स्किन सेल्सला रीजनरेट करण्यात मदत मिळते.
webdunia
विधी- पकलेल्या पपईचा रस काढून चेहर्‍यावर जिथे डाग असतील तिथे लावा आणि वाळल्यावर साध्या पाण्याने धुऊन टाका. एक महिना हा प्रयोग केल्याने आपल्याला याचा प्रभाव कळून येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्राय स्टायलिश कोट!