Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

10 मिनिटात उजळलेली त्वचा हवी असल्यास पटकन घरी बनवा फेस पॅक

10 मिनिटात उजळलेली त्वचा हवी असल्यास पटकन घरी बनवा फेस पॅक
आज आम्ही आपल्याला घरगुती फेस पॅकबद्दल माहिती देत आहोत ज्याने डेड स्कीन, टॅनिंग दूर करून स्वच्छ आणि उजळ त्वचा मिळवणे सोपे होईल:
 
1) दोन चमचे पुदिन्याच्या रसात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 10 मिनिटाने चेहरा धुऊन घ्या.
 
2) एक चमचा मधात दुप्पट बदाम पावडर आणि लिंबाचे चार-पाच थेंब मिसळून या पॅकने चेहर्‍यावर मसाज करा. 10 मिनिटाने चेहरा धुऊन घ्या.
 
3) बेसनात लिंबाचा रस आणि दूध मिसळून पॅक तयार करा. चेहरा आणि मानेवर लावून वाळू द्या. याने टॅनिंग दूर होण्यात मदत मिळते आणि डेड स्कीन निघून जाते.
 
4) पिंपल्सपासून सुटकारा हवा असल्यास मेथीच्या पानांची पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावा. 10 मिनिटाने चेहरा धुऊन घ्या.
 
5) किसलेला मुळा चेहर्‍यावर लावल्याने त्वचा उजळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाळ्याचे औषधी गुणधर्म जाणून घ्या …