Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

होळीच्या रंगांपासून केसांना वाचविण्यासाठी सोप्या टिप्स अवलंबवा

होळीच्या रंगांपासून केसांना वाचविण्यासाठी सोप्या टिप्स अवलंबवा
, मंगळवार, 23 मार्च 2021 (09:30 IST)
होळी काहीच दिवसांवर येऊन टिपली आहे. रंगामुळे केसांवर आणि त्वचे वर वाईट प्रभाव पडतो. या केसांना रंगाच्या दुष्प्रभावापासून वाचविण्यासाठी या टिप्स अवलंबवा. जेणे करून केसांना काही त्रास होणार नाही. आपण या पैकी कोणत्याही एका तेलाने आपल्या केसांची मॉलिश करा नंतर होळी खेळा. या मुळे केस सुरक्षित राहतील. चला तर मग जाणून घेऊ या 
 
 
1 मोहरीचे तेल- हे सर्वात जास्त फायदेशीर आहे या तेलात प्रथिन, सेलेनियम, व्हिटॅमिन बी,ओमेगा-3 फॅटी ऍसिड आढळते. हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. हे तेल केसांना होळीच्या रंगापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. या तेलाने केसाची मॉलिश करून होळी खेळू शकता. नंतर शॅम्पू करून घ्या.
 
2 नारळाचं तेल- हे देखील केसांसाठी खूप फायदेशीर आहे. या मध्ये आढळणारे असेन्शियल फॅटी ऍसिड,आणि व्हिटॅमिन केसांच्या मुळाच्या जवळ जमलेले सिबम काढून टाकतात आणि केसांची वाढ करतात. स्कॅल्पला पोषण देतात. होळीच्या रंगांपासून वाचविण्यासाठी केसानी मॉलिश या तेलाने करा.
 
3 ऑलिव्ह तेल- या मध्ये व्हिटॅमिन इ असते जे केसांचे सौंदर्य वाढवितात. या मध्ये असलेले ऑलयुरोपिन घटक केसांच्या वाढीस सहाय्यक आहे. हे अँटीऑक्सीडेंटने समृद्ध आहे. कंडिशनर चे काम करून केसांना सुरक्षित ठेवतो.होळीला या तेलाने केसांची मॉलिश करा.
 
4 बदामाचे तेल - फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन इ ने समृद्ध बदामाचे तेल मॉइश्चराइझरचे काम करतो. केसांना निरोगी ठेवतो. केसांचा कोंडा आणि स्कॅल्प मधील संसर्ग दूर करतो. होळी मध्ये या तेलाने केसांची मॉलिश करावी. 
आपण देखील होळीच्या रंगांपासून केसांचे संरक्षण करू इच्छिता तर या पैकी कोणत्याही एका तेलाने केसाची चांगली मॉलिश करा. आणि होळी खेळण्याचा आनंद घ्या. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साप आणि बेडूक बोध कथा