Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाचांना भेगा होण्यापासून टाळण्यासाठी या 7 टिप्स अवलंबवा

टाचांना भेगा होण्यापासून टाळण्यासाठी या 7 टिप्स अवलंबवा
, बुधवार, 2 जून 2021 (09:00 IST)
टाचा ज्याच्या मदतीने आपण चालतो उभे राहतो शरीराचे अविभाज्य भाग आहे.ज्याच्या मदती शिवाय काही कार्य करणे कठीण आहे.आपण बघितले असणार की बऱ्याच लोकांच्या टाचेला भेगा पडतात.त्यामुळे लोक त्यांना लपवतात. टाचांना भेगा पडू नये या साठी काही टिप्स सांगत आहोत.चला जाणून घेऊ या.
 
टाचांना भेगा पडण्याची कारणे -चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे देखील भेगा पडतात.या सह केल्शियम,व्हिटॅमिन इ आणि आयरन च्या कमतरते मुळे देखील भेगा पडतात.म्हणून आपल्या आहारात आणि दिनचर्येत कॅल्शियम,प्रोटीन,आणि व्हिटॅमिन इ युक्त गोष्टी खा.
 
टाचांना या पद्धतीने मऊ बनवा.
 
1 बोरोप्लस -  हे एक कॉस्मेटिक क्रीम आहे, परंतु रात्री, आपले पाय चांगले धुवा आणि नंतर हलक्या हाताने हे टाचेवर लावा आणि झोपा. काही दिवसांत टाचा ठीक होतील. घरी स्लिपर वापरा. जेणे करून टाचांना भेगा पडू नये.
 
2 ऑलिव्ह ऑईलचा वापर - तेल त्वचा मऊ करते. आठवड्यातून 3 वेळा झोपायच्या आधी ऑलिव्ह ऑईलने हलके हातांनी मालिश करा आणि झोपा. हे आपल्या टाचांची त्वचा खूप मऊ करेल.
 
3 मिठाच्या पाण्याने ते स्वच्छ करा -  आपण टाचांवर खुप क्रीम लावतो पण ते साफ करणे विसरतो. आठवड्यातून किमान दोनदा आपल्या टाचांना चांगले स्वच्छ करा. कोमट पाण्यात मीठ घाला आणि पाय काही काळ वेळ बुडवून ठेवा. यानंतर ब्रश किंवा दगडाने हळुवार चोळा. टाचेवरील साचलेली घाण बाहेर निघेल. टाचा चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. यानंतर नारळ तेल लावा.टाचा  खूप स्वच्छ आणि मऊ होईल..
 
4 लिंबू मलई - धुळीमुळे बर्‍याचदा टाचा खूप लवकर फुटतात. अशा परिस्थितीत रात्री झोपायच्या आधी पाय चांगले धुवावेत. यानंतर, लिंबू मलई लावा आणि झोपा. दररोज हे करा. आपल्याला  काही दिवसात आराम मिळेल.
 
5 तांदळाचे पीठ - तांदळाचे पीठ स्क्रब म्हणून काम करते. एका भांड्यात 3 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस घालून चांगले ढवळावे. जर आपल्या टाचांमध्ये खूप भेगा असतील. तर आपण 15 मिनिटे गरम पाण्यात आपले पाय ठेवावेत. यानंतर स्क्रब लावावे.
 
6 जवसाचे पीठ आणि जोजोबा तेल-हे दोन्ही आपल्या आवश्यकतेनुसार मिसळा आणि दाटपॅक बनवून लावून अर्धा तास तसेच ठेवा.नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.काहीच दिवसात आराम मिळेल.
 
7 ग्लिसरीन आणि गुलाबपाणी - या दोन्ही गोष्टींचा उपयोग केल्याने आपल्याला फाटलेल्या टाचांपासून लवकर आराम मिळेल. आपण ते एका बाटलीमध्ये देखील भरून ठेवू शकता. अर्धं गुलाब पाणी आणि अर्ध ग्लिसरीन एका बाटलीत मिसळा, त्यात थोडेसे लिंबू मिसळा. रात्री आपले पाय धुवूनआपण ते लावा.
i

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉक डाऊन मध्ये पती पत्नीमध्ये भांडण होऊ नये या साठी टिप्स