Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोपण्यापूर्वी अवलंबवा या ब्युटी टिप्स त्वचा उजाळेल

झोपण्यापूर्वी अवलंबवा या  ब्युटी टिप्स त्वचा उजाळेल
, शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (21:13 IST)
झोपण्यापूर्वी थकव्यामुळे लोक त्वचेसाठी काही करू शकत नाही जर झोपण्यापूर्वी आपण या टिप्स अवलंबविल्या तर आपली त्वचा उजाळेल चला तर मग जाणून घेऊ या 
 
1 पाण्याने चेहरा धुवा-  
त्वचेची काळजी घेण्यासाठी काही करण्याची आवश्यकता असते. या साठी झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुवा. त्या मुळे त्वचा शुद्ध होते. म्हणून झोपण्यापूर्वी पाण्याने चेहरा धुवा.  
 
2 हर्बल फेस मास्क वापरा-
झोपण्यापूर्वी हर्बल फेस मास्क त्वचेला निरोगी आणि पोषक ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हे वापरल्यानं त्वचेमधील नाहीसा झालेल्या पोषक घटकांची कमतरता पूर्ण होते. उन्हाळ्यात आपण मुलतानी माती किंवा काकडी किंवा चंदनाचा फेस मास्क लावू शकता.  
 
3 डोळ्यांची काळजी घ्या- 
रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर क्रीम आणि आय ड्रॉप टाकणे विसरू नका. डोळे हे सर्वात नाजूक अंग आहे. डोळ्यांच्या भोवती गडद मांडले झाले असल्यास डोळ्याला क्रीम लावा.
 
4  मॉइश्चरायझर लावा -
त्वचेला कोरड पडल्यामुळे चेहऱ्यावरचं नव्हे तर संपूर्ण शरीरावर देखील मॉइश्चरायझर लावू शकता. असं केल्यानं त्वचा मॉइश्च राहील आणि अकाळी पडणाऱ्या सुरकुत्या देखील कमी होतील.
 
5 केसांची मॉलिश करा- 
त्वचेसह केसांची काळजी घ्या रात्री झोपण्याच्या पूर्वी केसांची मॉलिश करू शकता. असं केल्यानं दिवसभराचा थकवा नाहीसा होईल. चांगली आणि पुरेशी झोप झाल्याने त्वचा उजाळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलांसाठी सर्वोत्तम हे योगासन आणि त्याचे फायदे जाणून घेऊ या