Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तळपायांची काळजी केवळ सौंदर्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर

तळपायांची काळजी केवळ सौंदर्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर
, शुक्रवार, 8 मे 2020 (12:30 IST)
तळपायांना शरीराचं दुसरं हृदय म्हणतात. तळपायांवर गादीसारखे भाग असते. ज्यांवर बरेच छिद्रे असतात. हे छिद्रे आकाराने मोठे असतात. ज्या वेळी आपण चालतो आपल्या शरीराचं संपूर्ण वजन ह्या तळपायांवर पडतं. त्यामुळे हे छिद्र प्रसरण पावतात. या छिद्रांमधून प्राणवायू ऑक्सिजन आत जातं आणि घामाच्या रूपाने आत गेलेले टॉक्सिन बाहेर पडतात. तळपायांवर दाब पडल्यावर रक्तवाहिन्यांवरील दाब वाढू लागतो आणि रक्त वरच्या दिशेने ढकलले जातं. त्यामुळे हे हृदयरोगांच्या रुग्णांना फायदेशीर असतं. 
 
तळपाय स्वच्छ असल्यास शरीराची त्वचा सुद्धा चमकते. तळपाय घाण असल्यास शरीराची त्वचा सुद्धा अस्वच्छ असते. तळपाय नियमाने स्वच्छ केले गेले तर शरीराच्या त्वचेला ऑक्सिजन मिळत राहते. तसेच शरीरात रक्त प्रवाह सुरळीत राहतो. 
 
रात्री झोपण्याआधी आपल्या तळपायांची स्वच्छता करावी. कमीत कमी 3 मिनिटे गरम आणि 1 मिनिटे थंड शेक घ्यावा. 
तळपायांची नियमाने मालीश करावी. तेल आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार निवडावे. घामट आणि कोरड पडलेल्या तळपायांची वॅसलिन आणि चंदनाच्या तेलाने मालीश करावी.
मुलांच्या आणि बायकांच्या कोरड्या टाचांना ऑलिव्ह ऑयल, चाल मोगरा (तुवरक), मोहरीचे तेल, वॅसलिन आणि लिंबाचे रस टाकून चोळावे. त्याच बरोबर टाचांमध्ये स्पंज कमी झाल्यास किंवा टाचांमधून रक्त येत असल्यास नारळाच्या तेलात शंखपुष्पी मिसळून मालीश करावी. 
सकाळी अंघोळ करताना तळपाय चोळून चोळून स्वच्छ घासावे. अंघोळी नंतर मोहरीचे तेल लावावे. 
उंच टाचांच्या चपला आणि जोडे वापरणे टाळावे. हे वापरल्यास रक्त पुरवठा कमी होतो. 
दर रोज कमीत कमी 15 ते 20 मिनिटे अनवाणी पायाने गवतावर किंवा ओल्या मातीत चालावे. तळपायाच्या गादीला वाढविण्यासाठी माती किंवा वाळू वर उड्या माराव्यात. 
असे केल्याने मज्जातंत्र मध्ये वाढ होते आणि हार्मोन्सचा स्त्राव संतुलित होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Thalassemia Day 2020 : थॅलेसीमिया काय आहे त्याचे लक्षण आणि उपचाराबद्दल जाणून घ्या