Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मूथ आणि आकर्षक 'ब्रेस्ट'साठी हे करा

स्मूथ आणि आकर्षक 'ब्रेस्ट'साठी हे करा
प्रत्येक स्त्रीला आपले ब्रेस्ट आकर्षक असावे असं वाटतं असतं. परंतू अनेकदा वयाप्रमाणे ब्रेस्ट लूज होऊ लागतात. आज आम्ही असे काही टिप्स शेअर करणार आहोत ज्याने आपण आपले ब्रेस्ट सॉफ्ट, स्मूथ आणि आकर्षक बनवू शकता.
स्क्रब
आपल्याला रोज ब्रेस्ट स्क्रब करायला हवे. ज्याने ते स्वच्छ होतील. हा भाग झाकलेला असला तरी त्यावर डेड ‍स्किन सेल्स जमू लागतात, ज्याने पोर्स बंद होऊन जातात. म्हणून स्किन फ्रेंडली स्क्रब वापरायला हवं.
 
फेशियल क्रीम
आपण फेशियल क्रीमने ब्रेस्टची मसाज करू शकता. याने ब्रेस्टवर सुरकुत्या पडणार नाही आणि ते मुलायम राहतील.

पाठीवर झोपणे
तज्ज्ञांप्रमाणे आपल्याला पोटावर नव्हे तर पाठीवर झोपायला हवे. पोटावर झोपल्याने ब्रेस्टवर दबाव येतो आणि त्याचा शेप बिघडतो. याने ब्रेस्टवर बारीक रेषा आणि सुरकुत्या पडू लागतात.
 
ब्रेस्टला मॉइस्चराइज करा
मॉइस्चराइजेशनची आवश्यकता केवळ चेहर्‍याला नसून ब्रेस्टलाही असते. दररोज अंघोळ झाल्यावर यावर मॉइस्चराइजर लावायला हवं. याने ब्रेस्ट ड्राय राहणार नाही.

सनस्क्रीन
ब्रेस्ट झाकलेले असले तरी बाहेर निघण्यापूर्वी त्यावर सनस्क्रीन लावायला हवं.
 
योग्य आहार
ब्रेस्टला सॉफ्ट ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे.यात प्रोटीन, लीन मीट, बींस आणि अंडी याचे समावेश असले पाहिजे. ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन इ युक्त आहार सेवन केला पाहिजे.
 
स्किन केयर एक्सपर्ट
वर्षातून एकदा स्किन केयर एक्सपर्टचा सल्ला घ्यावा. जर ब्रेस्टमध्ये कोणत्याही प्रकाराचा बदल किंवा अलॅर्जी सारखी समस्या दिसून आली तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क