1 कप मेंदी, 1 चमचा कॉफी पावडर, 1 चमचा दही, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा कात, 1 चमचा ब्राह्मी बुटीचे पावडर,1 चमचा आवळ्याची व वाळलेल्या पुदिन्याची पूड. हे सर्व साहित्यांचे प्रयोग तुम्ही आठवड्यातून 1-2 वेळा करू शकता.
सर्व साहित्य पर्याप्त पाण्यात दोन तास भिजत ठेवून त्याची पेस्ट केसांवर लावावी. जर केसांना रंग नसेल द्यायचा तर त्यात कॉफी व कात नाही घातले तरी चालेल.
नंतर केसांना पाण्याने धुऊन टाकावे. केसांना धुण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या साबणाचा प्रयोग टाळावा. शेतातील किंवा बागेतील मातीने केस धुतले तर एक एक केस मोकळा होतो जसे शँपू केले आहे.
(जवाकुसुम किंवा जास्वंदा)चे फूल आणि आँवळा, बरोबर वाटून त्याची पेस्ट तयार करावी, त्यात लोह चूर्ण घालून वाटून घ्यावे. या मिश्रणाला केसांमध्ये लावून एका तासाने केस धुवावे. वर दिलेले उपाय केले तर अवेळी केसांना पांढरे होण्यापासून वाचवू शकता.