Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Glowing skin रात्री लावा ग्लिसरीन आणि मिळवा चमकदार त्वचा

winter care tips
, सोमवार, 23 जानेवारी 2023 (23:14 IST)
त्वचेच्या ओलाव्यासाठी आणि विशेषतः हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. यासाठी रात्री त्वचेवर ब्युटी प्रॉडक्ट लावल्याने सकाळी चेहर्‍यावर वेगळाच ग्लो दिसून येतो. पण निश्चितच ते ब्युटी प्रॉडक्ट केमिकलयुक्त नसावे म्हणून ग्लिसरीन हे सर्वात योग्य प्रॉडक्ट आहे. रात्री चेहर्‍यावर ग्लिसरीन आणि लिंबू लावून झोपले तर चेहर्‍यावरील रुक्षपणा कमी होईल तसेच टाचांवर याचा प्रयोग फायदेशीर ठरेल. तर जाणून घ्या ग्लिसरीन लावण्याचे काय फायदे आहे ते: 
 
1. फेअर आणि डाग दूर करण्यासाठी ग्लिसरीनमध्ये लिंबाचे रस, गुलाब पाणी समप्रमाणात मिसळून लावावे. काही मिनिट याने मसाज करावी. आणि रात्रभर असेच राहू द्यावे. याने डाग दूर होतील तसेच त्वचा उजळेल. 
 
2. ड्रायनेस कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दुधाच्या सायीत जरा से ग्लिसरीन मिसळून चेहर्‍यावर लावून 10 मिनिट तसेच राहू द्यावे. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावे. 
 
3. रात्री झोपण्यापूर्वी मॉइस्चरायझरप्रमाणे ग्लिसरीन वापरले जाऊ शकतं. आपल्या रोज वापरण्याच्या क्रीमसोबत ग्लिसरीन मिसळून लावता येईल. तसेच क्रीम वापरायची नसल्यास साध्या पाण्यात ग्लिसरीन मिसळून लावता येईल.
 
4. त्‍वचेला चमकदार आणि मुलायम करण्यासाठी ग्लिसरीनला बेसन आणि चंदन पावडरसोबत मिसळून पेस्ट तयार करावी. चेहर्‍यावर लावून 20 मिनटापर्यंत वाळू द्यावे. नंतर धुऊन टाकावे. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करता येईल.
 
5. पिंपल्सचे डाग मिटवण्यासाठी ग्लिसरीन उपयोगी आहे कारण यात अँटीबॅक्‍टीरियल गुण आढळतात. यासाठी काही न मिसळत ग्लिसरीन वापरता येऊ शकतं.
 
6. ग्लिसरीन फेस टोनरचेही काम करतं. ग्लिसरीन आणि अॅप्‍पल साइडर व्हिनेगरला सामान्य प्रमाणात मिसळून स्वच्छ चेहर्‍यावर लावावे. नंतर याला धुणे गरजेचे नाही. 
 
तर आता आपल्या कळले असतीलच की ग्लिसरीनचे किती फायदे आहेत. फक्त गरज आहे याला आपल्या ब्युटी किटमध्ये सामील करण्याची. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Carrot marmalade गाजराचा मुरंबा