Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा
आहारात तुपाचा समावेश केल्याने होणारे फायदे सर्वांना माहीतच असतील, परंतू आपल्याला हे माहीत आहे का केसांच्या आरोग्यासाठीही तूप एक उत्तम पर्याय आहे. विश्वास होत नसेल तर अमलात आणू पहा. नरम, चमकदार आणि सुंदर केसांसाठी तूप वापरा आणि बघा हे 5 फायदे-
1 कोड्यापासून सुटका मिळवण्यासाठी- आपल्या केसांमध्ये कोंडा असेल तर केसांच्या मुळात तूप आणि बदामाचे तेलाने मसाज केली पाहिजे. याने डोक्यावरील त्वचा कोरडी राहणार नाही त्यामुळे कोंडा होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.
 
2 दुहेरी केस - खालील बाजूचे केस दोन भागात विभाजित होणे, अर्थात दुहेरी केस झाल्यावर ते वाईट दिसतात आणि त्यांची वाढही थांबते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुपाची मसाज करायला पाहिजे. काही दिवस तुपाने मसाज केल्यावर ही समस्या दूर होईल.

3 केसांचा विकास- जर आपल्या केसांचा विकास होत नसेल आणि आपल्याला लांब सडक केसांची आवड असेल तर केसांमध्ये तुपाची मालीश करावी आणि आवळा- कांद्याचा रस लावावा. दर 15 दिवसात एकदा ही प्रक्रिया 
अवश्य अमलात आणावी.
 
4 कंडिशनर - केसांमध्ये तूप सर्वोत्तम कंडिशनरचे काम करतं. हे आपल्या केसांना नरम बनवतं आणि केस गुंतवण्यापासून सुटका मिळेल. जैतूनच्या तेलासोबत हा उपाय केल्याने उत्तम परिणाम प्राप्त होतात.
 
5 चमक - केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी तूप लावणे उत्तम पर्याय आहे. वाईट ते वाईट परिस्थितीत असलेल्या केसांमध्येदेखील तूप लावल्याने चमक येते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साखरेमुळे होणारे पाच नुकसान