Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Hair Care Tips : कंडिशनर लावल्यानंतर केस गळतात, कारण जाणून घ्या

Hair Care Tips : कंडिशनर लावल्यानंतर केस गळतात, कारण जाणून घ्या
, मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (22:58 IST)
Hair Care Tips : केसांची काळजी घेण्याच्या नित्यक्रमाची पहिली पायरी म्हणजे शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ करणे. मात्र, केवळ शॅम्पूने केसांची काळजी घेत नाही, तर शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर लावणेही खूप महत्त्वाचे आहे. कंडिशनर केसांना मऊ करते, केस धुतल्यानंतर ते अत्यंत स्मूथ आणि रेशमी वाटतात. पण कधी-कधी हेअर कंडिशनर वापरल्यानंतर केस तुटायला लागतात.त्यामागील कारण जाणून घ्या.
 
1 जास्त प्रमाणात कंडिशनर लावणे-
 कंडिशनर  केस मऊ बनवते, परंतु याचा अर्थ असा नाही की एकाच वेळी खूप कंडिशनर लावावे . असं केल्याने केसांपासून कंडिशनर चांगले साफ होतनाही. अशा स्थितीत केसांमध्ये कंडिशनर राहिल्याने केस गळणे सुरू होतात.
 
2 चुकीचे कंडिशनर वापरणे-
 कंडिशनर लावत असताना, योग्य कंडिशनर निवडणे देखील खूप महत्त्वाचे आहे. काही लोक केसांना केमिकलयुक्त कंडिशनर लावतात किंवा केसांच्या प्रकारानुसार कंडिशनर लावत नाहीत. त्यामुळे केसांना फायदा कमी आणि नुकसान जास्ती होतो. कधीकधी या कारणामुळे केस गळणे देखील सुरू होते.
 
3 केसांना कंडिशनर लावण्याची पद्धत -
केसांमध्ये कंडिशनर लावल्याचा फायदा तेव्हाच होतो, जर ते योग्य प्रकारे लावले जाईल  काही लोक केसांसह स्कॅल्पला कंडिशनर लावतात. यामुळे त्यांना अतिरिक्त लाभ मिळेल, असे त्यांना वाटते. तर प्रत्यक्षात तसे होत नाही. स्कॅल्पला कंडिशनर लावल्यास केस लवकर गळतात.
त्यामुळे आता कंडिशनर लावताना या चुका करू नका आणि केसांची चांगली काळजी घ्या.
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Diwali Special Nashik chivda Recipe : नाशिकचा खमंग चिवडा रेसिपी