Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केस गळतीमुळे परेशान आहात? तर अमलात आणा हे 5 सोपे उपाय

hair care
केस गळतीची समस्या सामान्य आहे आणि यामुळे अनेक लोकं त्रस्त असतात. येथे आम्ही आपल्याला असे 5 अचूक घरगुती उपाय सांगत आहोत ज्यामुळे आपल्याला या समस्येपासून राहत मिळू शकते- 
 
1 रात्री आवळ्याची पावडर पाण्यात भिजवून ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी यातील वरील पाणी काढून घ्या. आता या पावडरमध्ये 1-2 कागदी लिंबू पिळून घ्या. आता या मिश्रणाने केसांची मालीश करा.
 
2 कडुनिंबाच्या तेलाचे काही थेंब नियमित रूपाने नाकात टाकल्याने आणि दररोज दुधाचे सेवन केल्याने केसगळतीची समस्या नाहीशी होईल.
 
3 उडीद डाळ उकळून गार झाल्यावर घासून-घासून लावा किंवा मालीश करा. असे केल्याने केसगळतीवर फायदा होईल.
 
4) लिंबाच्या रसात वडाच्या झाडांच्या रेषा मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण केसांना लावा आणि नंतर नारळाचं तेल लावावं. याने केसगळतीवर फायदा होतो.
 
5) एक चमचा अख्खे काळे तीळ आणि एक चमचा भांगरा अर्थात भृंगजराजाचे फुलं, फळं, पानं, खोड, मूळ बारीक वाटून पाण्यासोबत सेवन केल्याने केसगळतीची समस्या दूर होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात या गोष्टींचा समावेश करा