Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Homemade Cleansers : स्क्रब करण्यापूर्वी होममेड क्लिंझरने चेहऱ्याला मसाज करा

Homemade Cleansers : स्क्रब करण्यापूर्वी होममेड क्लिंझरने चेहऱ्याला मसाज करा
, बुधवार, 4 मे 2022 (21:09 IST)
बहुतेक लोक फेशियल करण्यापूर्वी फेस वॉश करतात परंतु ते त्यांच्या त्वचेला हायड्रेट करत नाहीत, ज्यामुळे स्क्रब करताना त्वचेवर पुरळ उठते. अशा परिस्थितीत, स्क्रब करण्यापूर्वी त्वचेला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. यासाठी क्लिंजरचा वापर करावा. हे आवश्यक नाही की या साठी बाजारातूनच क्लिंजर विकत घ्यावे, तुम्ही घरच्या घरीही क्लिन्जर बनवू शकता. फेसवॉश केल्यानंतर चेहऱ्यावर वापरा. त्यानंतरच स्क्रबिंग करा.चला तर मग क्लिन्जर कसे बनवायचे जाणून घ्या.
 
1 कच्चे दूध आणि कोरफडीचे जेल-
सर्वप्रथम, तीन चमचे कच्चे दूध घ्यावे लागेल. त्यात अर्धा चमचा एलोवेरा जेल घाला. नीट मिसळून क्लिंजर बनवा. यानंतर चेहऱ्यावर लावा आणि दोन मिनिटे मसाज करा. 
 
2 दही आणि एलोवेरा जेल -
ज्या लोकांना दूध आवडत नाही त्यांनी चेहऱ्यावर दही लावावे. दोन चमचे दही घ्या आणि त्यात एक चमचा एलोवेरा जेल मिसळा. आता ते मिक्स करून चेहऱ्यावर मसाज करा. 
 
3 मलई आणि हळद -
जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही एक चमचा मलईमध्ये चिमूटभर हळद घालू शकता. ते चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.स्क्रबिंग केल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील हळदीचा पिवळसरपणा नाहीसा होईल.
 
4 नारळाचे तेल -
नारळाचे तेल क्लिंजिंग साठी देखील खूप चांगले मानले जाते. यासाठी खोबरेल तेलाचे 4-5 थेंब घेऊन चेहऱ्याला लावावे लागेल. नीट मसाज करा आणि नंतर पाण्याने धुवा.
 
4 ऑलिव्ह ऑईल -
ऑलिव्ह ऑइल देखील क्लिंजिंगसाठी खूप चांगले मानले जाते. यासाठी ऑलिव्ह ऑईलचे 6-7 थेंब घेऊन चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे मसाज करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चहासह हरभरा डाळीचे कुरकुरीत चिप्स घ्या, साहित्य आणि कृती जाणून घ्या