Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुरकुत्या दूर करण्यासाठी बदाम तेल

सुरकुत्या दूर करण्यासाठी बदाम तेल
त्वचेसंबंधी समस्यांपासून सुटकारा मिळवण्यासाठी बदाम तेल उपयोगी आहे. बाजारातील केमिकलयुक्त महागडे पदार्थ वापरण्यापेक्षा बदाम तेल अधिक उपयोगी ठरेल. या नैसर्गिक पद्धतीने आपल्या सुंदरतेत वाढ होईल. परंतू हे तेल वापरण्यापूर्वी पेच टेस्ट करून घ्यावी. जाणून घ्या याचे फायदे
1. काळे वर्तुळे दूर होतील:  बदामाच्या तेलाने डोळ्याखालील काळे वर्तुळे दूर होण्यात आणि सूज कमी होण्यात मदत मिळते. आपल्या डोळ्याखालील त्वचेवर तेल लावा आणि परिणाम बघा.
 
2. सुरकुत्या कमी करतं: वाढत्या वयाला टक्कर देयची असल्यास बदाम तेल सर्वात उपयोगी ठरेल. हे तेल मधाबरोबर मिसळून प्रभावित जागेवर लावल्याने सुरकुत्या कमी होतात.

3. मृत त्वचा पेशी निघतात: हे तेल त्वचेवरून मृत त्वचा पेशी काढण्यात मदत करतं. याने मुरूम आणि डाग नाहीसे होतात.
 
4. अशुद्धी दूर करतं: बदामाच्या तेलात आढळणारे अँटीऑक्सीडेंट्स आपल्या त्वचेच्या रोम छिद्रांमध्ये साठलेली धूळ आणि अशुद्धी स्वच्छ करतं कारण रोम छिद्र बंद पडल्यास त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.
 
5. मॉइस्चराइजरचे काम करतं: बदाम तेल आपली त्वचा मॉस्चराइज करतं. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी आठवड्यातून दोनदा बदाम तेल वापरल्यास त्यांची त्वचा मुलायम होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्पेशल समर रेसिपी : चिंचेचा भात