Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Face Wash चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोपे उपाय

webdunia
गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (22:48 IST)
ताजेतवाने दिसण्यासाठी चेहरा स्वच्छ ठेवण्याची गरज असते. पण चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी काय, किती आणि कसं वापरायला पाहिजे हे माहिती असणं ही गरजेचं आहे. पाहू चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोपे उपाय:
 
* फेसवाश: चेहरा स्वच्छ आणि टवटवीत ठेवण्यासाठी फेसवाश गरजेचं आहे पण त्वचेच्या प्रकृतीनुरूप योग्य फेसवाश वापरला पाहिजे. हर्बल फेसवाश सर्वात उत्तम. तरीही दिवसातून फक्त दोन वेळा फेसवाश वापरा. जर आपण मेकअप करत नसाल तर रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाण्यानेही चेहरा धुऊ शकता.
 
* ऑइली स्किनसाठी नीम, कोरफड, आणि मिंट फेसवाश योग्य विकल्प आहे.
 
* ड्राय स्किनसाठी केसर, मिल्क आणि हनी फेसवाश वापरू शकता.
 
* डेड स्किनसाठी स्क्रब फेसवाश वापरणे योग्य ठरेल.
 
* कोमट पाणी: फेसवाशने चेहरा धुताना पाणी जास्त गरम नसलं पाहिजे याने स्किन खराब होते. त्वेचेसाठी जास्त गार पाणी ही योग्य नाही म्हणून ताज्या किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवायला हवा.
 
* घासू नका: चेहरा जास्त घासण्याने रंग गोरा दिसले हा विचार चुकीचा आहे. असे करणे हानिकारक ठरू शकतं. कारण अशाने त्वचेवरील नरम परत उतरते आणि स्किन कोरडी पडते. तसेच ज्यांना फेस वाइप्स वापरण्याची सवय असते त्यांनीही दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा याचा वापर करू नये.
 
* मेकअप काढा: मेकअप काढणे अत्यंत आवश्यक आहे. मेकअप काढल्याने त्वचासुद्धा मोकळा श्वास घेऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi Poem नातीगोती असावीत नेहमी आंबट गोड चवीची