Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मास्क वापरल्याने ऍलर्जी होत असल्यास हे सौंदर्य टिप्स अवलंबवा

मास्क वापरल्याने ऍलर्जी होत असल्यास हे सौंदर्य टिप्स अवलंबवा
, शुक्रवार, 21 मे 2021 (17:53 IST)
आधी सूर्याच्या तीव्र प्रकाशामुळे चेहरा झाकला जात होता. आता कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी चेहरा झाकावा लागत आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. सध्या दोन मास्क लावावे लागत आहे. या मुळे चेहऱ्यावर अनेक समस्या उद्भवत आहे. कोरोना विषाणूच्या दरम्यान आपण वारंवार आपल्या तोंडाला हात लावू शकत नाही. चला तर मग जाणून घ्या की आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घेता येईल.
 
1 मेकअप करू नका- आपल्याला हे माहित आहे की मास्क लावायचे आहे  तर कोणत्या ही प्रकारचा  मेकअप करू नका. या  मुळे आपल्याला खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. मेकअप केल्याने चेहऱ्यावरील ऑक्सिजनचा संचार कमी होतो. या मुळे चेहऱ्यावर पुरळ,मुरूम होण्याचा धोका वाढतो. 
 
2 मास्क लावू नका- आपण एकटे असाल तर मास्क लावू नका. बाहेरून आल्यावर चेहरा फेसवॉश ने स्वच्छ धुवून घ्या आणि मॉइश्चराइजिंग सौम्य क्रीम लावून घ्या. या मुळे चेहऱ्याचा ओलावा टिकून राहील.
 
3 टूथपेस्ट लावा- जर आपल्याला चेहऱ्यावर मास्क लावल्याने मुरूम येतं आहे तर रात्री झोपण्यापूर्वी टूथपेस्ट लावा असं आपण 1 आठवड्या पर्यंत करा. हळू-हळू आराम मिळेल. 
 
4 नारळाचं तेल - शरीरावर  रॅश आल्यावर नारळाचं तेल लावतात.कारण त्याची प्रकृती थंड असते. जर आपल्याला ही चेहऱ्यावर खाज येतं असेल किंवा रॅश आले असतील तर नारळाचं तेल लावू शकता. या मुळे काही नुकसान होणार नाही. 
 
5 वाफ घ्या- चेहऱ्यात योग्य प्रमाणात ऑक्सिजन चा पुरवठा होत नसेल तर एक्ने किंवा मुरुमांचा त्रास होतो.या साठी आपण चेहऱ्यावर कोरफड जेल लावून गरम पाण्याची वाफ घेऊ शकता. या मुळे चेहऱ्यावर ओलावा टिकून राहील, चमक येईल आणि मुरूम देखील कमी होतील.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चहासह खास स्नॅक बटाटा-रव्याची भजी