Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महत्त्वाच्या मेकअप टीप्स

महत्त्वाच्या मेकअप टीप्स
, शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (23:58 IST)
मेकअपच्या बेससाठी शीयर फाऊंडेशन वापरा. यामुळे मेकअपला शायनिंग लूक मिळतो त्याचप्रमाणे मेकअप बराच काळ टिकतो. 
 
आपल्याकडे बर्‍याच महिला पेल शेड्स वापरतात, मात्र भारतीय लोकांच्या त्वचेचा रंग बघता त्यांच्या स्किनटोनला या शेड्स मॅच होत नाहीत. त्यामुळे लाईट कलरपेक्षा एक शेड डार्कर टोन निवडा. सर्वसाधारणपणे पिंकीश मॉव कलर सगळ्या स्किनटोनवर मॅच होतो. 
 
सध्या १९६0च्या दशकातील फॅशन परततेय. विशेषत: आयलाईनर वापरताना हे लक्षात ठेवा. या ट्रेंडनुसार आयलाईनर डोळ्यांच्या कोपर्‍यातून थोडा बाहेर यायला हवा. 
 
पार्टीसाठी सज्ज होत असाल तर पेहरावाच्या रंगाशी मिळतीजुळती आयश्ॉडो निवडा. साधारणत: लाईट ब्ल्यू, पिंक आणि ग्रीन या शेड्स सर्व प्रकारच्या स्किनटोनवर मॅच होतात. आयलाईनर, मस्कारा आणि काजळ डोळ्यांची आकर्षकता वाढवते. 
 
केस मोकळे सोडायचे असतील तर स्ट्रेटनिंगचा पर्याय योग्य ठरतो. यामुळे केसांना आपोआपच एक छानसा मॉडर्न लूक मिळतो. क्रिंपिंग, रोलर अथवा ड्रायर सेटिंगमुळेही केसांना स्टायलिश रूप देता येतं. सध्या लेयर्स आणि रेजर फॅशन चलतीत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खूप प्रेम असलं तरी दर्शवणे देखील गरजेचे