हिवाळ्यात केस कोरडे दिसू लागतात. अशात केसांची चमक टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही घरी बसल्या नारळाच्या दुधाचे उपाय करु शकता-
नारळाच्यादुधाचा हेअर मास्क कसा बनवायचा-
एका कपमध्ये नारळ पाणी काढून घ्या. नंतर त्यात ऑलिव्ह ऑईल, एक चमचा मध घाला. नंतर नारळाचे दूध काढण्यासाठी त्याचा पांढरा भाग मिक्सरमध्ये बारीक करुन पाण्यात उकळून 10 मिनिटे सोडा. आता मलमलच्या कापडाच्या मदतीने नारळाचे दूध गाळून घ्या.
नंतर दुधात ऑलिव्ह ऑईल, एक चमचा मध मिसळून केसांना लावा. केसांना 10 मिनिटे वाफवून सोडा. किमान 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर सौम्य शैम्पूने केस धुवा. आठवड्यातून किमान दोनदा हा उपाय करता येईल.
फायदे-
याने केसांचा ओलावा परत येईल. केसांच्या मुळांना खोलवर पोषक मिळेल. यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांच्या वाढीसाठीही उपयुक्त ठरतील. कोंड्याची समस्या दूर होईल.