Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाड आणि दाट केस मिळवण्यासाठी केस विंचरताना या गोष्टी लक्षात ठेवा

Hair combing tips
, मंगळवार, 10 जून 2025 (00:30 IST)
Hair Care Tips: आपण दररोज केस विंचरतो, पण बहुतेक लोकांना हे माहित नसते की निरोगी केसांसाठी योग्य प्रकारे विंचरणे महत्वाचे आहे. निरोगी आणि मजबूत केसांसाठी केस विंचरताना या गोष्टी लक्षात ठेवा. जेणे करून दाट आणि जाड केस मिळतील. चला तर मग जाणून घेऊ या.
रुंद दात असलेला कंगवा वापरावा 
बारीक दात असलेल्या कंगव्या किंवा ब्रशपेक्षा रुंद दात असलेल्या कंगव्या केसांना अधिक मऊ करतात. ते ताण न घेता केसांचा गुंता सोडवण्यास मदत करतात.
 
एका टोकापासून विंचरणे सुरु करा
केस विंचरताना टोकापासून विंचरा आणि हळू हळू वरच्या दिशेने न्या. असं केल्याने केस तुटण्यापासून बचाव होतो. 
 
केसांना विभागून घ्या 
केसांना लहान भागांमध्ये विभागून घ्या आणि प्रत्येक भाग वेगळा करून कंगवा करा असं केल्याने केसांवरील ताण कमी होईल. 
कंगवा हळुवार करा 
केस विंचरताना केसांना ओढू नका, गुंता काढून घ्या. केसांना हळुवारपणे वेगळे करा.
 
केसांना नियमितपणे विंचरा 
केस विंचरल्याने टाळूतील नैसर्गिक तेल निघून जाते, असं केल्याने केस निरोगी आणि मॉइश्चरायझ्ड राहतात.
टाळूची मॉलिश करा 
डोक्याला मॉलिश केल्यामुळे रक्ताभिसरण वाढू शकते. बोटानी किंवा मऊ ब्रशने टाळूची मॉलिश गोलाकार दिशेने करा. 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हितोपदेशातील मनोरंजक कथा: सिंह, उंदीर आणि मांजरीची गोष्ट