Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एम आय प्रेझेंटेबल?

एम आय प्रेझेंटेबल?
आजची वर्किंग वूमन प्रेझेंटेबल असण्याला फार महत्त्व देते. ऑफिसमध्ये जाताना केलेला थोडासा मेकअप तुमचं सौंदर्य खुलवतोच पण तुमचा आत्मविश्वासही वाढवतो. अर्थात गोरं करणार्‍या क्रीमच्या जाहिरातीप्रमाणे फक्त त्यावर अवलंबून राहून चालत नाही. पण रोजच्या मिटिंग्ज अटेंड करताना मेकअपमुळे तुम्ही फ्रेश राहता. योग्य कॉस्मेटिकच्या वापराने चेहरा तेलकट होत नाही आणि मीटिंगसाठी फारशी तयारीही करावी लागत नाही. या साध्या सोप्या मेकअप टिप्सनी खुलवा तुमचं सौंदर्य आणि ऑफिसमध्ये दिसा एकदम फ्रेश...

* एकाच दिवशी बर्‍याच मिटिंग्ज असल्या तर तुम्ही थकून चालणार नाही. चेहर्‍यावरही तो उत्साह दिसायला हवा. अशा वेळी जास्त वेळ टिकणारा मेकअप निवडा. बाजारातही अशी अनेक क्रीम्स असतात जी तुमचा चेहरा 12 ते 15 तास फ्रेश ठेवतात. आपल्या चेहर्‍याला सूट होईल, अशी क्रीम्स तुम्हाला निवडता येतील.

webdunia

 
बराच काळ बाहेर राहणार असाल किंवा धावपळीचा दिवस असेल तर हलकी कॉम्पॅक पावडर लावा. यामुळे तुमचा चेहरा घामाघूम होणार नाही.

* मस्कारा किंवा आयशॅडोमुळेही तुमचा चेहरा दिवसभर ताजातवाना दिसू शकतो. त्यामुळे ऑफिसला जाताना हलक्या रंगाच्या आयशॅडोला प्राधान्य द्या. मस्कार्‍चाही हलका थर द्या. हलका मेकअप संध्याकाळपर्यंत टिकून राहील आणि पसरणार नाही.

webdunia

 
गुलाबी किंवा पिच शेडमधली लिपस्टिक ऑफिससाठी अगदी बेस्ट आहे. लाइट शेडमुळे तुमचा चेहरा भडक दिसणार नाही. यासोबतच हे रंग तुमचं सौंदर्य खुलवतील आणि चेहरा अधिक उजळ दिसेल. या रंगामधील मॅट किंवा ग्लॉस लिपस्टिक तुम्ही ट्राय करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपल्याला तर नाही 'काउच पॉटेटो सिंड्रोम', जाणून घ्या 5 नुकसान