केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. पण केस रंगवताना केमिकलचा वापर नुकसान करु शकतं. अशात हीना देखील चांगला पर्याय आहे. पण त्याहून लाल रंग दिसून येतो अशात त्यात काही गोष्टी मिसळ्यास केस काळे दिसू शकतात.
आज आम्ही आपल्याला एका पावडरबद्दल सांगत आहोत जी मेंदीत मिसळल्याने सुंदर, काळे आणि गुळगुळीत केस मिळू शकतात.
मेंदीत मिसळण्यासाठी ही पावडर या प्रकारे तयार करा-
1 कप लाल कांद्याची साले कढईत मध्यम आचेवर ठेवून गरम करा. कांद्याची साले काळी होईपर्यंत कोरडी भाजून घ्या. आता ही साले मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवा.
आता या प्रकारे तयार करा केसांवर लावण्याची मेंदी
एका वाडग्यात मेंदी घ्या तयात ही पावडर आणि एक चमचा कोरफड जेल मिसळा. ते रात्रभर झाकून ठेवा. किंवा किमान 4-5 तास तरी ठेवा. लावण्यापूर्वी हे निश्चित करा की आपले केस आणि टाळू जास्त घाण किंवा तेलकट नाहीत. हे मिश्रण लावल्यानंतर शॉवर कॅप घाला आणि 1 तसेच राहू द्या. त्यानंतर सौम्य शैम्पू आणि सामान्य पाण्याने केस धुवा.
हे वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करुन बघा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.