Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Monsoon hair care : पावसाळयात केस गळतात,या 7 टिप्स अवलंबवा

Monsoon hair care : पावसाळयात केस गळतात,या 7 टिप्स अवलंबवा
, शनिवार, 26 जून 2021 (08:50 IST)
पावसाळ्यात पाण्यात भिजल्यामुळे चेहऱ्यावर तसेच केसांच्या अनेक समस्या उद्भवतात.या हंगामात केस तुटतात आणि गळतात.स्कॅल्पमध्ये जास्त काळ ओलावा राहिल्यामुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवतात.
 
चला काही हेयर टिप्स जाणून घेऊ या ज्यांना अवलंबवून आपण या हंगामात देखील केसांना निरोगी ठेवू शकता. 
 
1 जर आपले केस वारंवार पाण्यात ओले होतात तर आपण त्यांना शॅम्पूने धुवावे.
 
2 ओल्या केसांना मोठ्या दातांच्या कंगव्याने विंचरून घ्या, जेणे करून केस व्यवस्थित विंचरले जातात आणि तुटत देखील नाही.
 
3 ओले केसांना प्रथम कोरडे होऊ द्या.नंतर बांधा.ओलसर असलेल्या केसांना ओलेच बांधल्यावर त्यांच्या मधून वास येईल आणि त्यात उवा होण्याची शक्यता वाढते.केसांची क्वालिटी देखील खराब होते.
 
4 केस धुतल्यावर कंडिशनर करावे.जेणे करून केसात गुंता होत नाही आणि केस सहजपणे मोकळे होतात.या हंगामात केसांमध्ये कोरडेपणा येतो केस रुक्ष होतात. आणि तुटतात,हे टाळण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे केसांना कंडिशनर लावणे.
 
5 आठवड्यातून किमान एकदा तरी केसांना तेल लावावे,जेणे करून केसांना योग्य पोषण मिळेल आणि केसांचा रुक्षपणा कमी होईल.असं केल्याने केस निर्जीव होणार नाही आणि त्यात चमक बनून राहील.  
 
6 आपला कंगवा कोणाशीही शेयर करू नका.आपले केस लांब असल्यास आपण पावसाळ्यात लहान केस ठेवू शकता.या मुळे आपल्याला एक लावीन लूक देखील मिळतो आणि केसांची निगा व्यवस्थितरित्या राखली जाऊ शकते.
 
 
7 या व्यतिरिक्त आपण आपल्या आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे.अन्नाचा परिणाम आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांवर पडतो.तर केसांवर देखील पडेल,म्हणून आपल्या आहाराची काळजी  घ्या.आहार नियमित ठेवा,बाहेरचे कमी खा आणि फास्टफूड खाणे टाळा.आपल्या आहारात प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करावा. जसे की-अंडी,गाजर,डाळी,हिरव्याभाज्या,डेअरी उत्पादक.इत्यादी.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्रेकअप नंतर स्वतःला आठवडीतून काढण्यासाठी या टिप्स अवलंबवा