Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

याने रात्रभरात चेहर्‍यावर येईल शाईन

याने रात्रभरात चेहर्‍यावर येईल शाईन
काय आपला चेहरा सकाळी उठल्यावर ड्राय आणि डल दिसतो? अनेक कंपन्यांच्या क्रीम आणि लोशन वापरून झाले असल्यावरही चेहर्‍यावर ती चमक येत नाहीये का? तर आम्ही आज आपल्या घरगुती नाइट फेस मास्कबद्दल माहिती देत आहोत ज्याने आपली त्वचा चमकदार होण्यात मदत मिळेल.

 
हळद आणि बेसन
चार चमचे बेसन आणि दोन चमचे दूध किंवा सायीत चिमूटभर हळद मिसळून मास्क तयार करा. हा रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा. सकाळी गार पाण्याने धुऊन घ्या.
 
स्ट्रॉबेरी
व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिडने भरपूर स्ट्रॉबेरी त्वचेला निरोगी बनवतं. हे मास्क तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरी दुधासोबत क्रश करून पेस्ट तयार करा. त्यात एक चमचा बेसन मिसळून चेहर्‍यावर लावा. सकाळी गार पाण्याने धुऊन घ्या. चेहरा चमकदार दिसेल.
 
ओट्स आणि दही
ओट्स बारीक वाटून त्या एक चमचा दही, एक चमचा मध आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. आवश्यकतेनुसार पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा. सकाळी उठल्यावर धुऊन घ्या.

चंदन
ड्राय, ऑयली आणि पिंपल असलेल्या ‍त्वचेसाठी चंदनाचे मास्क उत्तम आहे. हे लावल्याने खाज दूर होते आणि त्वचा निरोगी राहते. हे मास्क तयार करण्यासाठी चंदन पावडरमध्ये जरा दूध, लॅवेंडर ऑयल आणि दोन चमचे बेसन मिसळा. किंवा आपण फक्त चंदन पावडर ही वापरू शकता. नंतर गार पाण्याने धुऊन टाका. चेहरा ग्लो करेल.
 
झेंडू
झेंडूच्या फुलात अॅटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टिरिअल गुण असतात. झेंडूचे पाने दुधात भिजवून ठेवा. यात एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावा. सकाळी पाण्याने स्वच्छ करा.
 
गुलाब
गुलाबाच्या झाडांची पाने उन्हात वाळवून घ्या नंतर याची पावडर तयार करा. यात दूध, साय मिसळून आवश्यकतेनुसार ग्लिसरीन मिसळा. हा मास्क रात्रभर लावून ठेवा.
 
लिंबू आणि मध
दोन चमचे मधात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून त्वचेवर लावा. रात्रभर चेहर्‍यावर राहून द्या. सकाळी उठून धुऊन घ्या. त्वचा चमकेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेवल्यानंतर या 6 वस्तू आहे विषसमान