Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्वचेसाठी वरदान आहे गुलाबाचे तेल

त्वचेसाठी वरदान आहे गुलाबाचे तेल
गुलाबाच्या तेलात अँटी व्हायरल अवसादरोधी, अँटीसेप्टिक आणि अँस्ट्रिंजेंट गुण आढळतात. गुलाबाचे तेल त्वचेसाठी वरदान आहे असे म्हणायलाही हरकत नाही. बघू याचे फायदे:

 
त्वचा स्वच्छ करतं: गुलाबाच्या तेलात अँटीऑक्सीडेंट गुण आढळतात जे त्वचेहून फ्री रॅडिकल हटवतात. याने रोम छिद्रात घाण जमत नाही आणि त्वचा स्वच्छ राहण्यात मदत मिळते.
 
त्वचेची सूज कमी होते: गुलाबाच्या तेलात सूज कमी करणारे अँटीव्हायरस गुण असतात जे जळजळ आणि सुजेत फायदेशीर ठरतात. गुलाबाच्या तेलाचे काही थेंब जळजळत असलेल्या भागावर लावल्याने फायदा होतो. जळजळ कमी करण्यासाठी गुलाबाच्या तेलात नारळाचे तेल मिसळावे आणि या तेलाने जळत असलेल्या भांगेवर हलकी मालीश करावी.

पिंपलवर प्रभावी: गुलाबाच्या तेलाने पीपलास नाहीसे होतात आणि त्वचा डागरहित होते. यात अँटीव्हायरस आणि प्रतिजैविक गुण असल्यामुळे डाग आणि पिंपल होण्यापासून मुक्ती मिळते.
 
मॉइश्चराइज करण्यात मदत करतं: गुलाबाचं तेल त्वचेचा पीएच स्तर नियमित करतं त्यामुळे नैसर्गिकरीत्या त्वचेला नमी मिळते. आपण यासाठी नियमित क्रीममध्ये तेल मिसळून चेहर्‍यावर लावू शकता.
 
छिद्र लहान करतं: यात अँस्ट्रिंजेंट गुण असल्याने हे चेहर्‍यावरील खोल झालेले छिद्र लहान करण्यात मदत करतं. 30 हून अधिक वय झाल्यावर गुलाब जलदेखील फायदेशीर ठरतं. याने पिंपल्स होण्याची शक्यताही कमी होते.

हायड्रेटिंग बेस रूपात: त्वचेला हायड्रेंट करण्यासाठी गुलाबाच्या तेलात जरा पाणी मिसळून घ्या. हे फाउंडेशन लावण्यापूर्वी लावा. याने चेहर्‍यावर बेस बनण्यात मदत मिळते. जोपर्यंत चेहरा तेल शोषून घेत नाही तोपर्यंत तेलाची मालीश करणे आवश्यक आहे.
 
वय कमी दिसतं: गुलाबाच्या तेलाने रुक्ष, बेजना आणि सुरकुत्या पडलेल्या त्वचेवर लाभ होतो. गुलाबाच्या तेलाने मालीश केल्यावर वय कमी दिसू लागतं. याने चेहर्‍यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या नाहीश्या होतात.
 
रुक्ष त्वचेवर उपयोगी: अनेक लोकांच्या डोळ्याखाली त्वचा रुक्ष असते. त्यावर गुलाबाचे तेल फायदेशीर ठरतं. याने कोरडेपणा दूर होऊन त्वचा नरम पडते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चाचा नेहरु (मुलं देवा घरची फुलं)