रोजमेरी ऑईलमध्ये पिंपल्सशी लढणारे तत्त्व असतात, जे कुठलेही डाग न सोडता पिंपल्सला ठीक करतात.
रोजमेरी ऑईल
या तेलात अँटी-बॅक्टीरियल तत्त्व असतात आणि प्रभावित जागेवर लावल्याने बॅक्टीरिया नाहीसे होतात. बॅक्टीरियामुळे होणारे पिंपल्स याने साफ होऊ लागतात. फक्त 8 तासांमध्ये याचा प्रभाव दिसू लागतो.
या तेलाचा वापर कसा करावा ?
कापसाच्या बोळ्यात तीन थेंब रोजमेरी ऑईल घ्या आणि झोपण्याअगोदर पिंपल्स प्रभावित स्कीनवर लावा. दिवसा हे तेल लावू नये कारण तेव्हा चेहर्यावर धूळ बसते, ज्यामुळे अधिक समस्या होण्याची शक्यता असते.
या तेलाचा वापर करण्याची एक अजून पद्धत आहे. तुम्ही हे तेल तुमच्या दररोज वापरण्याच्या लोशनमध्ये मिसळून ही लावू शकता.
रोजमेरी ऑईल पाठीवर होणारे पिंपल्स ज्याला बॅक एक्ने म्हणतात, त्यासाठी देखील उत्तम ठरेल. या साठी अंघोळीच्या पाण्यात या तेलाचे 8-10 थेंब मिसळा. काही दिवसा फरक जाणवेल.