रोज मालीश करायला पाहिजे, पण रोजच्या गडबडीत शक्य नसेल तर किमान आठवड्यात एकदा तरी मालीश करायलाच हवी.
तुमच्या मनाच्या शांतीसाठी अरोमा मेणबत्या लावा, त्यानी घरातील वातावरण शुद्ध होईल व तुमचे मन प्रसन्न राहील.
झोपण्याअगोदर रोज चेहरा धुऊन झोपावे. जर तुम्ही वर्किंग वूमन असाल तर डीप क्लीजिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करावा.
आपल्याला रोज गाढ झोप हवी असल्यास झोपताना व्यक्तीने हलका आहार घ्यावा, असा सल्ला वैद्यकीय चिकित्सकांनी दिला आहे.
आपल्याला जीवनाकडून काय हवं आहे, हे आधी नीट समजून घ्या. तुम्ही जे काम करणार आहात, त्याचा आनंद उपभोगत ते करायला शिका.