शरीरातील प्रत्येक भाग छान दिसण्यासाठी काही टिप्स..

सोमवार, 8 जुलै 2019 (13:02 IST)
सर्वच तरुणींना आपली त्वचा सुंदर असावी आपण छान दिसावे असे वाटत असते. मात्र सर्वांनाच ते जमत नाही कारण आपण जे फेस पॅकचा वापर करतो तो तितकीच त्वच्या गोरी करतो तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग छान दिसण्यासाठी आम्ही तुम्हांला देत आहोत काही खास टिप्स त्या पुढीलप्रमाणे:
 
त्वच्या कोमल होण्यासाठी दूध आणि मध एकत्र मिक्स करून स्नान केल्यास त्वच्या कोमल राहते. दुधामधील प्रोटीन आणि फॅटचे प्रमाण त्वचेला आतून एक्सफोलिएट करण्याचे काम करते. या व्यतिरिक्त दुधातील लॅक्टिक अँसिड मृत पेशींना दूप करण्याचे काम करते. त्यामुळे त्वचेवरील ड्रायनेस कमी होतो. 
 
ज्या लोकांना कोणतीही अँलर्जी असते अशा लोकांनी ही मध व दुधात स्नान करणे फायदेशीर असते. या स्नानामुळे त्वचेला अंर्तगत पोषण मिळते. 
 
तसेच या स्नानामुळे तुम्ही लवकर वृद्ध होणार नाही त्यामुळे तुमची त्वच्या तरूण दिसते. 
 
मध आणि दुध एकत्रित घेतल्यास थेट नर्वस सिस्टमवर प्रभाव पडतो. दुध त्वचेला कोमल बनवते तर मध त्वचेला नवजीवन प्रदान करते.
 
अरोमासाठी सी सॉल्ट आणि लेव्हेंडर ऑइल वापरले जाते. तणाव दूर करण्यासाठी सुध्दा या मिश्रणाने स्नान केली जाते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख कोरड्या खोकखल्यासाठी घरगुती उपाय नक्की करून बघा...