Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स
, सोमवार, 16 डिसेंबर 2024 (05:26 IST)
न्यूड मेकअप लूकचा सध्या खूपच वापर केला जातो. यासाठी ब्लॅक मस्कराचा वापर करा. आपल्याला  त्वचेला सूट होईल असा नैसर्गिक रंग आणि गुलाबी रंगाच्या लिप कलरचा वापर करा. आकर्षक दिसण्यासाठी न्यूडेकअप लूकसाठी कोणत्या टिप्सचा वापर केला पाहिजे ते जाणून घ्या.
 
- आपल्या डोळ्यांना नॅचरल लूक देण्यासाठी पापण्यांना ब्लॅक मस्करा लावा आणि केस कुरळे करा.
- डोळ्यावरच्या आतील कोपर्‍यापर्यंत काजळ लावा. त्यामुळे पापण्या सुंदर आणि आकर्षक दिसतील.
- गालावर नॅचरल चमक येण्यासाठी चीकबोन्सला हायलाइट करा. सध्या न्यूड मेकअप लूकसाठी आपल्या त्वचेला सूट होईल अशा नॅचरल शेडची निवड करा.
- यासाठी हलक्या रंगाचा वापर करा. चेहरा चमकण्यासाठी ओठांना हलल्या गुलाबी रंगाची पिंक शेडची लिपस्टीक लावून त्यावर शाईन येण्यासाठी लिप ग्लॉसचा वापर करा. त्यामुळे अजूनच आकर्षक लूक येईल.
- न्यूड मेकअप लूकसाठी एकाच रंगाचे वेगवेगळ्या शेड्‌सचा वापर करा. 
- न्यूड शेड्‌स लावण्याआधी लाईट बेस लावा आणि आवश्यक असल्यास हलक्या हातांनी लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sunday Special Recipe : फ्राइड चिकन पॉपकॉर्न