Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Home Manicure : 8 स्टेप्समध्ये घरी बसल्या करा पार्लर सारखं मॅनिक्युअर

Home Manicure : 8 स्टेप्समध्ये घरी बसल्या करा पार्लर सारखं मॅनिक्युअर
तुम्ही सोशल मीडियावर एक्सप्लोर पेजवर स्क्रोल करताना नेल आर्ट व्हिडिओ देखील पाहत असाल आणि व्हिडिओ पाहताना तुम्ही मॅनिक्युअरचा विचार करता करत असाल? 
 
मॅनीक्योर आपल्या हातांसाठी खूप फायदेशीर आहे, परंतु पार्लरमध्ये महागड्या मॅनिक्युअर करून घेण्यापेक्षा तुम्ही पार्लरसारखे मॅनिक्युअर कमी खर्चात घरी बसून करू शकता. 
 
या 8 स्टेप्सद्वारे तुम्ही घरी बसून मॅनिक्युअर कसे करू शकता -
 
Manicure करण्यासाठी आपल्याला या सामुग्रीची गरज भासेल- 
 
- नेल पॉलिश रिमूव्हर
- नेल पेंट
- कॉटन किंवा कॉटन पॅड
- नेल बफर आणि नेल कटर
- क्यूटिकल्स पुशर
- हँड क्रीम आणि क्यूटिकल्स क्रीम
- ट्रंपेरेंट नेल पोलिश
- शैम्पू किंवा क्लीन्झर
 
स्टेप 1: नेल पॉलिश रिमूव्हर
सर्वप्रथम, नेलपॉलिश रिमूव्हरने तुमचे नखे पूर्णपणे स्वच्छ करा जेणेकरुन तुमच्या नखांवर नेलपेंट चांगला लावता येईल आणि तुमच्या नखांवर जुन्या नेल पेंटचा डाग राहणार नाही.
 
स्टेप 2: नेल कटिंग
यानंतर, तुमची नखे योग्य आकारात कापून घ्या जेणेकरून तुमच्या सर्व बोटांच्या नखांचा आकार सारखा असेल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार नखे कापू शकता, पण खूप लहान नखे कापू नका. तसेच तुम्ही नेल बफरसह तुमच्या नखांना आकार देऊ शकता.
 
स्टेप 3: कोमट पाण्यात हात भिजवा
आपले नखे स्वच्छ केल्यानंतर, एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात आपले हात सुमारे 3-5 मिनिटे भिजवा. तुम्ही पाण्यात शैम्पू किंवा क्लीन्झर घालू शकता. यामुळे तुमच्या हातांची त्वचा मऊ होईल आणि मृत त्वचा सहज स्वच्छ होईल. तसेच तुमच्या नखांभोवतीची त्वचाही मऊ होईल.
 
स्टेप 4: क्यूटिकल्स हटवा
क्यूटिकल्स म्हणजे आपल्या नखांभोवती कोरडी त्वचा. तुम्ही तुमचे हात पुसल्यानंतर, क्युटिकल क्रीम लावा आणि नंतर क्यूटिकल पुशरच्या मदतीने क्यूटिकल मागे ढकलून द्या. हे लक्षात ठेवा की तुम्ही जास्त जोर लावू नका अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते आणि क्यूटिकलला जास्त धक्का देऊ नका.
 
स्टेप 5: आपल्या हातांवर क्रीम लावा
हातांची त्वचा खूप मऊ असते, त्यामुळे हात भिजवल्यानंतर हातावर हँड क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावा. लक्षात ठेवा की नखांवर क्रीम लावू नका जेणेकरून तुमचे नेल पेंट सहज लावता येईल.
 
स्टेप 6: नेल पेंट लावण्यापूर्वी बेस लावा
नेल पेंट लावण्यापूर्वी, नखांवर पारदर्शक किंवा क्लियर नेलपॉलिशचा पातळ थर लावा. असे केल्याने तुमच्या नेलपेंटचा रंग अधिक उभरेल आणि नखांवर तुमचा नेल पेंट सहज लावला जाईल.
 
स्टेप 7: नेल पेंट लावा
यानंतर नेल पेंट लावा. आपण आपल्या आवडीचा कोणताही रंग लावू शकता किंवा नेल आर्ट देखील करवू शकता.
 
स्टेप 8: क्लियर नेल पेंट द्वारे फिनिशिंग द्या
नेल पेंट लावल्यानंतर आपण क्लियर किंवा ट्रांसपेरेंट नेल पेंट आधीची नेल पेंट वाळल्यानंतर लावा. यामुळे तुमचा नेल पेंट चकचकीत दिसेल आणि तुमच्या हातावर थोडा जास्त काळ टिकेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Keratin Treatment करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, ज्याचा खूप उपयोगी आहेत